कर्जाळ कन्नड, मराठी व उर्दु शाळेत म.गांधी व शास्त्री यांची जयंती साजरी

Karjal Z.P.School

। कर्जाळ : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड, मराठी व उर्दू शाळेत 2 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तंबाखुमुक्तीसाठी समाज प्रबोधन करण्यात आले व शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या वेळी कन्नडचे मुख्याध्यापक बसवराज गुरव, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका दंडोती मॅडम, सुवर्णा पाटील, अंजूमआरा शेख, वसीमा शेख, कोरबू मॅडम, गुरव मॅडम, कनशेट्टी मॅडम, अंगणवाडी मदतनीस राजश्री गायकवाड, शा.पो.आ.मदतनीस सुवर्णा पाटील व पालक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन गुरव यांनी तर आभार दंडोती यांनी मानले.

About Author