ओला दुष्काळ पाहणी दौर्‍यात दरेकर यांना महेश हिंडोळे यांचे निवेदन सादर

darekar

। संगोळगी: प्रतिनिधी
संगोळगी ब.येथील शेतकरी खंडप्पा करकी यांचे परवाच्या पुरामध्ये 2 म्हशी,1 गाय,1 बैल,1 रेडा,1 वासरू,1 शेळी, दगावले असून 1 बैल वाहून गेले आहे, अश्याच प्रकारे संगोळगी , रुदेवाडी, आंदेवाडी, चिंचोली, बबलाद, बो.रामपूर, बो.उमरगे येथील अनेक शेतकर्‍यांचे जनावरे, शेतातील पिके, माती, वाहून गेले असून आज आ. प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते (वि.प.) यांच्या ओला दुष्काळ पाहणी दौर्‍यात खा.डॉ. जयसिद्धेश्वर स्वामीजी,मा.आ. सचिन कल्याणशेट्टी, नगरसेवक महेश हिंडोळे यांचे उपस्थितीत अनेक शेतकर्‍यांनी निवेदन सादर केले, व दरेकर यांनी पंचनामे करून पूर्वीच्या शासन जी.आर. नुसार त्वरित नुकसान भरपाई देऊन आवश्यक गावांचे पुनर्वसन प्रस्ताव सादर करणेबाबत प्रशासनाला सूचना दिल्या.

About Author