ओला दुष्काळ जाहीर करणे व तातडीने नुकसान भरपाई मिळणे कामी पालकमंत्र्यांना निवेन

ripai

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात परतीच्या पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक लोकांचे घरे पडली आहेत शेतकर्‍यांचे हातातोंडाला आलेले पीक वाया गेले आहेत अनेक लोक बेघर झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे व अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. अशा पूरग्रस्त लोकांना तात्काळ पंचनामे न करता नुकसान भरपाई देण्यात यावी.
शेतकर्‍यांच्या खात्यात तात्काळ रोख मदत देण्यात यावी ज्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत अशांना तात्काळ पुनर्वसन करावे त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी व अक्कलकोट तालुका ओला दुष्काळ जाहीर करून सर्वतोपरी शासकीय मदत देण्यात यावी. या मागणीचे निवेदन यावेळी रिपाइंचे ता.अध्यक्ष अविनाश मडीखांबे रासपाचे जिल्हा अध्यक्ष सुनील बंडगर व रिपाइं नेते प्रा.राहुल रुही यांनी सोलापूरचे पालकमंत्री मा. दत्तात्र्यय भरणे यांना अक्कलकोटचे कार्यक्षम आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

About Author