आरपीआयच्यावतीने ओला दुष्काळ जाहीर करणे व विविध मागणीचे निवेदन

ripai

। अक्कलकोट : प्रतिनिधी

पूरग्रस्त पाहणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अक्कलकोट पाहणी दौर्‍यावर आले असताना रिपाइं आठवले गट अक्कलकोट यांच्या वतीने तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा तसेच विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, पूरग्रस्त घरांचे नुकसान भरपाई म्हणून 250000 प्रमाणे नुकसानभरपाई देण्यात यावी, पूरग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे न करता सरसकट एकरी 1 लाख रुपये अनुदान थेट खात्यात जमा करण्यात यावे, पूरग्रस्तांतील शेतकर्‍यांचे पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे न करता तोंडी जबाब घेऊन नुकसान भरपाई द्यावी, मराठा समाजास न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण देण्यात यावे, सोलापूर ते गुलबर्गा येथील राष्ट्रीय महामार्गातील भूसंपादन झालेल्या शेतकर्‍यांचे आर्थिक लुबाडणूक करणारे तत्कालीन उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र-1 यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, मागासवर्गीय विध्यार्थ्यांचे शैक्षणिक फी माफ करावी, अक्कलकोट शहर व तालुक्यातील रमाई व पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू शासन ॠठ प्रमाणे मोफत देण्यात यावी, शासकीय निवासी शाळेतील कंत्राटी शिक्षकांचे थकीत वेतन लवकरात लवकर देऊन त्याना कायम करण्यात यावे, अक्कलकोट शहरातील संस्थान कालीन हत्ती तलाव दुरुस्तीसाठी 50 लाखाचा आपत्कालीन निधी देऊन करून दुरुस्ती करावी, आशा विविध मागण्याचे निवेदन सांगवी येथे रिपाइं तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे व प्रा.राहुल रुही यांनी दिले.
यावेळी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चेअंती त्यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री बाबासाहेब थोरात यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले. आमदार सचिन कल्याणशेट्टी विविध अधिकारी दौर्‍यावर उपस्थित होते. तात्पुरवी सांगवी येथील दुर्लक्षित 11 कुटूंबाना रिपाइं ता.अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या प्रयत्नाने 95 हजार 100 रुपये मुख्यमंत्री यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी रिपाइंच्या मागणीला प्रत्येकी कुटुंबाला आर्थिक मदत केल्याबद्दल अविनाश मडीखांबे यांनी मुख्यमंत्री महसूल मंत्री अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व तहसीलदार यांचे आभार मानले.

About Author