आपतग्रस्त शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार : माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे

। अक्कलकोट : प्रतिनिधी
तालुक्यातील पूरग्रस्त भागातील आपत्ग्रस्त शेतकर्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आ.सिध्दाराम म्हेत्रे यांनी केले. ते काशिलिंग देवस्थान ट्रस्ट जेऊर यांच्यावतीने अक्कलकोट तालुक्यातील हालहळ्ळी (मै) येथील अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यात फटका बसलेल्या नागरिक व शेतकर्यांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी म्हेत्रे बोलत होते.
याप्रसंगी जि.प माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, मल्लिकार्जुन काटगाव, न.प अ.कोटचे विरोधीपक्ष नेते अश्पाक बळोरगी, शिवराज स्वामी, बाबासाहेब पाटील, मंगला पाटील आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले, तालुक्यातील ज्या-ज्या भागात संकट आला आहे. त्याठिकाणी शासनाकडून भरीव मदत निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आदी सोबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकर्यांना मदत मिळावे प्रयत्न करुन मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले.