आगामी काळात सर्व निवडणुकात एमआयएम ताकदीनिशी उतरणार : हाजी फारुकभाई शाब्दी

। अक्कलकोट : प्रतिनिधी
आगामी काळात सर्व निवडणुकात एमआयएम पक्ष सर्व तयारीनिशी आपली ताकद दाखवेल, असा दावा एमआयएमचे जिल्हाध्यक्ष हाजी फारुकभाई शाब्दी यांनी केला.
अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करण्यासाठी अक्कलकोट शहर व तालुकास्तरीय मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी नूतन कार्यकारिणी प्रक्रिया पार पडली.
पुढे बोलताना शाब्दी म्हणाले, आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद यासह सर्व निवडणुकात एमआयएम भक्ष ताकतीनिशी उतरुन लढविणार आहेत. आजपर्यंत मुस्लीम समाजाचा वापर केवळ मतदानापुरता केला गेला. यापुढे मुस्लीम समाजाशिवाय कोणालाही सत्तेवर येता येणार नाही, अशी ताकद निर्माण करणार आहोत. प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन एमआयएम पक्षाच्या माध्यमातून गोर गरिबांच्या हितासाठी, कल्याणासाठी केलेल्या चांगल्या कामाची आठवण जनतेला करुन देणार असल्याचे यावेळी शाब्दी यांनी सांगितले.
सदरील मेळाव्यात तालुक्याची नूतन कार्यरिणी निवडण्यात आली. तालुका एमआयएम पक्षाच्या अध्यक्षपदी अतिक बागवान, तालुका युवक अध्यक्षपदी सैपन हगलदिवटे, अक्कलकोट शहर अध्यक्षदी इरफान दावण्णा, शहर युवक अध्यक्षपदी सैपन शेख यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी मौला पठाण, अकिब बागवान, इसाक अत्तार, हुसेन बळोरगी, पालेखान पठाण, अश्पाक सय्यद, आरिफ शेख, तैय्यब शेख, मदार कानदार, इसाक अत्तार, इब्राहिम सुतार, अजीज शेख, रहिमान अत्तार, जुबेर फुलारी, अहमद कुरेशी यांच्यासह एमआयएम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.