अशी निष्ठावंत माणसं आता दुर्मिळच : सुशीलकुमार शिंदे

स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या निधनानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी स्वकुटूंबासह म्हेत्रे परिवाराची घेतली भेट
। दुधनी : प्रतिनिधी
अक्कलकोट तालूका हा काँग्रेसचा अभेद भिंत राहिला.त्यांच्याशी आमची दृढ मैत्री होती.त्यांच्यासारखे निष्ठावंत माणूस आजपर्यंत मी फार कमी पाहिली आहेत.पक्षाच्या जडणघडणीसाठी अशी माणस दुर्मिळ होत चालल्याची भावना माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.जेष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या निधनानंतर माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संपूर्ण कुटूंबियांसह दुधनी येथे जाऊन म्हेत्रे परिवाराची भेट घेतली. यानंतर शिंदे यांनी ही भावना व्यक्त केली.
शुक्रवारी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दुधनी येथे स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी जेष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, गटनेते चेतन नरोटे, शंकर म्हेत्रे, सातलिंग शटगार, अश्पाक बळोरगी, सुरेश हसापूरे, जहॉगीर शेख, मंगल पाटील, समाधान अवताडे आदी उपस्थित होते.
माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचे पिताश्री तथा जेष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर क्षणातच मनाला धक्का बसला. अत्यंत वाईट वाटले. सन 1974 च्या काळात भाई छन्नोसिंग चंदेले यांना अक्कलकोट विधानसभेची उमेदवारी मिळाली होती. झालेल्या निवडणुकीत चंदेले यांना निवडून आणण्यासाठी जेष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी आमच्यासोबत जीवापाड कार्य केले. स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांची कै. नामदेवराव जगताप, तत्कालीन आमदार बी.टी.माने, काशिराया काका पाटील, चपळगावचे स्व.इनायतल्ली पाटील, कै.महादेव पाटील यांच्याशी दृढ मैत्री होती.
पूढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सातलिंगप्पा म्हेत्रे हे न्यायनिवाडा पारखून करायचे.दुधनी आणि संपूर्ण अक्कलकोट तालूक्याच्या विकासासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. राजकीय पटलावर त्यांचा दबदबा होता,ते अजातशत्रू होते.म्हणूनच दुधनीच्या जनतेने सातलिंगप्पा म्हेत्रे आणि म्हेत्रे परिवाराला नगराध्यक्ष म्हणून तब्बल 40 वर्षे बिनविरोध संधी दिली होती. गांधीवादी तत्वाने जगणारे व्यक्तीमत्व राजकीय पटलावरून नाहीसे झाल्याची भावना मनाला सलत आहे.
अलीकडच्या काळात दुधनीला जाऊन त्यांची भेट घेतली होती. मात्र यानंतर त्यांच्या अचानक जाण्याने तालूक्याची फार मोठी हानी झाली आहे. माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या प्रत्येक कार्यात,वाटचालीत स्व.सातलिंगप्पा यांची प्रेरणा महत्वाची भूमिका ठरली आहे. त्यांच्या जाण्याने म्हेत्रे घराण्यावर तरी दुःखाचा डोंगर कोसळला आहेच. मात्र गोरगरिबांचा वाली गेल्याची बाब हृद्याला सलत आहे.
यावेळी मल्लिनाथ म्हेत्रे, संगमनाथ म्हेत्रे, गुलाब खैराट, चाँद नाकेदार, शिवानंद माड्याळ, शरणप्पा माळगे, विश्वनाथ हडलगी, सिद्धण्णा गोळगोंडा, गुरू हबशी, महेश कोटणूर, मल्लू कोटणूर, रामा गद्दी, राजू म्हेत्रे, महादेव कोटणूर, विश्वनाथ म्हेत्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.