अरुण लोणारी यांच्या वाढदिवसानिमित्त पाच जोडप्याचे विवाह संपन्न

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट येथे कोळी समाज संघटनेचे राज्याध्यक्ष अरूण लोणारी (कोळी) यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ-वाल्मिकी प्रतिष्ठानच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळ्यात आयोजन 5 जोडप्याचे विवाह करण्यात आले.
याप्रसंगी सोलापूर जिल्हाचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर स्वामीजी, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार रमेश पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, कोळी महासंघाचे नेते देवानंद भोईर, अक्कलकोटचे उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरचे चेअरमन महेश इंगळे, राज्य उपाध्यक्ष अरूण कोळी, सोलापूर जिल्हा महादेव कोळी समाज संघर्ष समितीचे समन्वयक प्रा. अशोक निंबरगी, कर्मचारी राज्याध्यक्ष रामभाऊ कोळी, नेते अंबादास कोळी, समन्वयक रवि यलगुलवार, नेते नागेश बिराजदार, कर्नाटकचे नेते शिवकुमार नाटीकर, नगरसेवक महेश हिंडोळे, आरपीआयचे ता.अध्यक्ष अविनाश मडिखांबे, धनंजय महाराज पुजारी, अरूण लोणारी, ऋषीकेश लोणारी व मित्रपरिवार, कोळी समाज बांधव, कोळी महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अशोक निंबरगी, सूत्रसंचालन शशिकांत वसंतपुरे यांनी तर आभार मल्लिकार्जुन सोमेश्वर यांनी मानले.