अन्नछत्र मंडळाच्यावतीने आ.भाई जगताप यांचा सत्कार

। अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासा कडून माझा जो सत्कार संपन्न झाला तो माझ्या करिता प्रेरणादायी एक स्वामींची शक्ती असल्याचे मनोगत आमदार व मुंबईचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केले.
आमदार भाई जगताप यांची मुंबई कांग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समोरील कांग्रेस कार्यालयात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांचे हस्ते श्रींची मूर्ती , कृपावस्त्र , प्रसाद , बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भाई जगताप बोलत होते,
पुढे बोलताना भाई जगताप म्हणाले, माझे जन्मेजयराजे भोसले यांच्याशी गेल्या कित्येक वर्षांपासून ऋणानुबंध कायम आहे, पुढेही राहील असे सांगून भाई म्हणाले, आज जन्मेजयराजे भोसले यांनी मुंबई प्रदेश चे अध्यक्ष पद मिळताच त्यांनी त्यांचे चिरंजीव अमोलराजे भोसले यांना पाठवून आज माझा जो सत्कार केला तो कधीही विसारण्या जोगे नाही, हा सत्कार माझ्या करीता नक्कीच स्वामी कृपा , आशिर्वाद असणार असून मुंबई करांची आणि महाराष्ट्राची सेवा करण्याचे बळ मला मिळाले आहे, श्री क्षेत्र अक्कलकोट ला लवकरच सहकुटूंब श्री स्वामींच्या दर्शनासाठी येणार असल्याचे भाई म्हणाले.
या वेळी आमदार भाई जगताप यांचे स्वीय सहाय्यक अतुल बर्वे, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.