अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावली रॉबिनहूड आर्मी

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीमुळे रामपूर,बोरी उमरगे,ममनाबाद या गावी पूरस्थिती निर्माण झाली आहे तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे त्या लोकांना आज रॉबिन हूड आर्मी तर्फे अन्नदान व पाणी बॉटल देण्यात आले.
यावेळी रॉबिन हूड आर्मी चे देविदास गवंडी, अनंत क्षीरसागर, आशिष हुंबे, आकाश शिंदे, अविनाश क्षीरसागर, शशिकांत महाजन, रशिद खितस्के, सागर पवार, श्रीधर गुरव, अमित चव्हाण, सुमित जाधव, विशाल मुलगे, अक्षय गंगणे, आकाश तुवर सोनू पाटील, समर्थ शिरसाट, अप्पा गवळी आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी प्रशांत कडंबगावकर, खंडोबा मंदिर पुजारी, आकाश शिंदे,अनुप महाराज पुजारी यांचे सहकार्य लाभले.
दुपारपासुन रामपूर, बोरी उमरगे, मध्ये आहे. इथल्या लोकांकडून माहिती घेत आहे. बाहेरुनही अनेकजण कॉल करुन इथल्या परिस्थिती आणि लागणार्या मदतीविषयी विचारत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बोरी उमरगे आणि रामपूर, ममनाबाद, सांगवी पूरग्रस्त गावांत बचावकार्याला गती आली आहे. धरणावर पाऊस कमी झाल्याने सकाळी वाढलेली पाणीपातळी कमी होईल अशी आशा आहे. लष्कराच्या बोटी, दाखल झाले आहेत.
ग्रामीण भागात गावंच्या गावं सोडून लोकं बाहेर नातेवाईकांकडे किंवा सखल भागात येऊन थांबली आहेत. माणसांसोबतच जनावरांच्याही मदतीकडे लक्ष द्यायला हवे. जनावरांना ओला चारा मिळत आहे, पण सुक्या चार्याची गरज भासत आहे. कडबा, पेंड, भुसा या स्वरुपात देऊ शकला तर उत्तम राहील.