अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या पात्र लाभार्थ्यांची बँकांनी अडवणूक करु नये : तहसिलदार अंजली मरोड

। अक्कलकोट : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या पात्रता लाभार्थ्याऐंना अक्कलकोट तालुका-शहरातील राष्ट्रीयकृत सहकारी, खाजगी बँकांकडून कर्ज उपलब्ध करुन देणे अनिवार्य आहेच तरी अडवणूक करु नयेत अशा सूचना तहसिलदार अंजली मरोड यांनी दिल्या आहेत.
सोमवारी महामंडळाच्या पात्रता लाभार्थ्यांना अक्कलकोट तालुका शहरातील राष्ट्रीयकृत, सहकारी, खासजगी बँकांकडून कर्ज उपलब्ध करुन देणे अनिवार्य करण्यात यावे व आदेश काढण्यकामी सर्वच बँकांची बैठक लावण्याबाबतचे मराठा समाजासह विविध पक्षाचे शिष्टमंडळ घेऊन शासन निर्णयासह निवेदन सादर केले. याप्रसंगी मरोड ह्या बोलत होत्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज निकम, महामंडळाचे संचालक प्रशांत भगरे, मराठा सेवा संघाचे ता.अध्यक्ष प्रविण घाटगे, सकल मराठा समाजाचे प्रविण देशमुख, प्रहारचे जिल्हा युवक सचिव विजय माने, संभाजी ब्रिगेडचे ता.अध्यक्ष मनोज गंगणे यांच्यावतीने तहसिलदार अंजली मरोड यांना निवेदन सादर करण्यात आले.
मरोड यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महामंडळाकडून मराठा समाजातील बेरोजगार युवकांना व्याज परतावा योजनेसह अन्य काही योजनांच्या माध्यमांतून विविध बँकांकडून कर्ज उपलब्ध करुन देण्याकामी केंद्र व राज्य सरकारचे निर्देश आहेत. मात्र बँक ऑफ इंडिया शाखा-अक्कलकोट व युनियन बँक शाखा अक्कलकोट वगळता अन्य बँकांकडून कर्ज देण्याकामी सकारात्मक आहेत. मात्र टाळाटाळ करणे, दिवस ढकलणे, वरिष्ठ बँक अधिकार्यांशी चर्चा करतो, आरओ कार्यालयाशी संपर्क साधतो, कोवीड-19 मुळे कर्मचार्यांची कमतरता महामंडळाची फाईल घेऊन ठेवणे, मात्र कार्यवाही न करणे अशा एक ना अनेक कारणांमुळे मराठा समाजातील युवकांना बँकाकडून त्रास देताना निदर्शनास येत आहे. महामंडळ व्याजाचा परतावा करण्याबाबत लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत असताना काही बँकाकडून जाणिवपूर्वक टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास व प्रत्यक्षात पहावयास मिळत आहे.
बँकाकडून असेच टाळाटाळ होऊ नये असे झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यास संपूर्ण जबाबदार बँक व प्रशासन असणार आहे. तरी महामंडळाच्या पात्रता लाभार्थ्यांना अक्कलकोट तालुका शहरातील राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी आदी बँकांकडून मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करुन देणे अनिवार्य करण्याबाबतचे आदेश काढावेत. प्रत्येक बँकांनी 20-20 प्रकरणे मंजूर करावेत. अशा आशयाचे निवेदन तहसिलदार मरोड यांना दिले. याप्रसंगी अरविंद पाटील, सावळाराम यादव, शुभम चव्हाण, शुभम सावंत, प्रमोद जाधव, शिवा याळवार, दिनेश बंडगर, आदीजण उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज पाहता, मराठा समाजातील बेरोजगार युवकांना उद्योजक बनवत आहेत. मात्र विविध बँकाकडून अडवूणक होत आहे. महामंडळाच्या पात्र लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावेत. कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाच्या सन 2017 शासन निर्णयानुसार विविध योजना राबविण्यात येत आहेत. तालुका शहरातील बँकांची बैठक तर लावूच या बरोबरच कर्ज उपलब्धतेबाबत पत्र देखील काढण्यात येईल. महामंडळाने जिल्हास्तरावरील कामकाज आवश्यकतेनुसार सहाय्यक संचालक, जिल्हा विकास रोजगार व उद्योजकता यांनी मार्गदर्शन केंद्र, जिल्हा समन्वयक यांनी देखील विविध बँकांची बैठक लावावी. जिल्ह्यात महामंडळाची कामगिरी चांगली आहे.
अंजली मरोड, तहसिलदार अक्कलकोट.