अक्कलकोट येथील 1902 साली स्थापलेले बुधवार पेठेतील अंबाबाई मंदिर

Ambabai Mandir, Budhwar peth1

। अक्कलकोट, प्रतिनिधी
अक्कलकोट शहरातील बुधवार पेठ कामाठी गल्लीतील संस्थान काळच्या पूर्वीपासून आराध्य दैवत श्री अंबाबाई मंदिर आहे. ती जागृत व नवसाला पावणारी देवी असल्याने नवरात्री मध्ये राज्य व परराज्यातील लाखो भक्तगण दर्शनाला येत असतात. बुधवार पेठ अंबेचे मंदिर अक्कलकोट पंचक्रोशतील प्रती तुळजाभवानी मंदिर मानले जाते, अशी भाविकांची श्रध्दा आहे.
सन 1902 साली कामाठी गल्लीतील कोळी समाजाचे भिमण्णा नकाले, रामण्णा कटाले, रामण्णा मुस्ती, भिमण्णा गिरबोने, बाळप्पा रावकंडे (कामाठी) आदी समाज बांधवांनी मिळून गल्लीत एखाद्या मंदिराचे स्थापन करावयाचे यामुळे शांती, समाधान मिळेल व बसण्या उठण्यासाठी जागा होईल या हेतुने विचार विनिमय करुन यामध्ये कोणी विठ्ठलाचे तर कोणी अंबाबाईचे स्थापन करण्याचे सांगत होते. विठ्ठलाला मास, मच्छी व दारु चालत नसल्यामुळे बहुतांश लोकांनी श्री अंबाबाईचे मंदिर स्थापन करण्याचे सुचवल्याने भिमण्णा नकाले, रामण्णा कटाले, रामण्णा मुस्ती, भिमण्णा गिरबोने, बाळप्पा रावकंडे आदींनी श्री अंबाबाईचे मूर्ती कर्नाटकातील चिक्कोडी येथून आणुन एका पत्र्याच्या कुडात श्री अंबाबाईचे मुर्तीचे विधिवत स्थापन करण्यात आली. त्या देवीचे नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ अलंकारात विधिवत पूजा केली जाते; घटस्थापनेला देवीसमोर घट घालुन देवीच्या यात्रेला सुरुवात होते. या उत्सवात अनेकांना मान-पान देण्यात आला. यामध्ये लातुर जिल्ह्यातील एकादेवी भक्तांस नवरात्रीच्या पौर्णिमेदिवशी लातुरहून नंदी काठी पायी चालत आणत होते. मात्र कालांतराने त्या भक्ताचा मृत्यू झाल्याने त्या नंदी काठीचा मान त्यांचे भाचचे यादवराव पवार यांना मिळाला आहे. या मंदिरात येणारे देवीभक्त प्रसिध्द अडत व्यापारी धानप्पा धोत्री, शिवणप्पा रामशेट्टी, विष्णुपंत शिंपी यांनी मोठा हातभार लावून मंदिराचे विस्तारीकरण केले. या देवीच्या दर्शनासाठी राजे विजयसिंह नवरात्रीत दर्शनासाठी येत होते. यावेळी नवरात्रीत दसरादिवशी सिमोल्लंघनाचे पुजानाचे मान राजे विजयसिंहाना होते. अशी या मंदिराचे आख्यायिका आहे. या मंदिराचे 1972 रोजी धर्मादाय न्यासचा रजिस्टर नोंदणी करण्यात आला.
यानंतर घटस्थापनेपूनस परंपरेप्रमाणे या देवीचे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. घटस्थापनेला देवी समोर घट घातले जाते. रोज पहाटे नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता पंचामृत अभिषेक, कुंकूमार्चन केला जातो. त्यानंतर दिवसर भजन, किर्तन, देवीचे गाणे म्हटले जातात. अष्टमीच्या दिवशी गाणगापूरहून दिगंबरसह सहाजणांनी श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे अण्णु पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तमीच्या रात्री एक ते अष्टमीच्या सकाळी आठ पर्यंत विविध मंत्रोपच्चाराने चंडी होम केला जातो. यावेळी इच्छुक दांमत्यांना पुजासाठी बसविले जाते. तर दशमीच्या म्हणजे दसर्‍याच्या दिवशी गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींकडून सिमोल्लंघनाचे पूजा केला जातो. आणि पौर्णिमेला देवीचा गावातील प्रमुख मार्गावरुन पालखी उत्सव साजरा केला जातो. नवरात्री पौर्णिमेच्या पहाटे मानकरी दत्तात्रय पवार, यादवराव पवार यांच्या घरी वाजत गाजत जाऊन त्यांच्या घरातील पंचामृत आणून पहाटे अभिषेक केला जातो. त्यानंतर इतर भक्तांचा अभिषेक केला जातो. या देवीचे तुळजापूर श्री भवानीमाते सारखाच नऊ दिवस, नऊ अलंकारात पुजा केला जातो. पौर्णिमेच्या दिवशी अभिषेकानंतर श्री अंबाबाईचे पालखी उत्सवास प्रारंभ मंदिरापासून कामाठी गल्ली, बुधवार पेठ, कारंजा चौक, मौलाली गल्ली, आझाद गल्ली, डबरे गल्ली, देशमुख गल्ली ते श्री स्वामी समर्थ मंदिर जवळील श्री हनुमान मंदिराजवळ थांबते. तेथून यादवराव पवार यांचे मानाची काठी पालखी सोबत घेवून सबिनव्दारे वाजत गाजत मोठ्या उत्साहात ही पालखी फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ, समर्थ चौक, सेंट्रल चौक, वीर सावरकर चौक, मेन रोड, कारंजा चौक, बुधवार पेठ ते कामाठी गल्ली आणि श्री अंबाबाई मंदिर येथे श्रींच्या पालखीचे सांगता करुन भक्तांना महाप्रसादाचे वाटप केला जातो. या मंदिराचे मुख्य पुजारी नरसिंग बेळ्ळे, आणि मंदिर समितीचे अध्यक्ष भिमाशंकर गिरबोने यांच्यासह संचालकांनी आलेल्या देवी भक्तांना देवीचे चांगले दर्शन घडविण्यासाठी सहकार्य करीत असतात. ही देवी जागृत व नवसाला पावणारी असल्याने दिवसेंनदिवस भक्तांचे ओघ वाढत आहे.

About Author