अक्कलकोट येथील शशिकला मुकणार राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित
। अक्कलकोट : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य नगरपालिका- महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ यांच्या तर्फे आदर्श शिक्षिका म्हणून न.प.प्राथ.शि.मं., अक्कलकोट येथील शशिकला मुकणार यांचे राज्याचे शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या शुभहस्ते, तसेच राज्य अध्यक्ष अर्जून कोळी, राज्याचे कार्याध्यक्ष संजय आवळे, राज्य सल्लागार पंडितराव भंडारी आणि राज्यमहिला संघटक साधना साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा येथे आज सोमवार दि.4 जानेवारी 2021 रोजी भव्य- दिव्य कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
सदर निवड ही सन 2019-20 करिता माहे सप्टेंबर महिन्यांतच भारताचे माजी शिक्षणमंत्री व शिक्षणतज्ञ सर्वपल्ली राधाकृष्णन राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त राज्य शिक्षक संघाने आपल्या मासिक सभेतआदर्श शिक्षक आणि आदर्श शाळा आधीच ठरविले असून सदर कार्यक्रम दि.5 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षक दिनाच्यामुहूर्तावर औचित साधून होणार होती. परंतु कोरोना विषांणूच्या महामारी या रोगांमुळे आणि लॉकडाऊनच्या समस्येमुळे पुढे-पुढे ढकलत शेवटी राज्य शिक्षक संघाने शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडून वेळ घेऊन ती नूतन वर्षात 4 जानेवारी 2021 रोजी निश्रि्चत केले.
राज्य शिक्षक संघाने प्रत्येक विभागातून आदर्श शिक्षक व आदर्श शाळा असे आणि विविध पुरस्काराने राज्यातील निवडक शिक्षकांचा सन्मानित करण्याचे धोरण सन 2018-19 सालापासून चालू केलेला आहे. गतवर्षासाठी न.प.शि.मंडळ अक्कलकोट येथून संगीता बावलत्ती मुलींची शा.नं-1 यांची निवड आळंदी येथील कार्यक्रमात आदर्श शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले होते. यंदा न.प.प्रमिला राजे गर्ल्स स्कूल, अक्कलकोट या शाळेतून शशिकला मुकणार (कांबळे) यांची राज्य संघाकडून निवड करण्यात आली आहे. यासाठी मनपा-मनपा शिक्षक संघ शाखा-अक्कलकोट येथील सर्व पदाधिकार्यांनी या निवडीसाठी परिश्रम घेतलेली आहे. मुकणार यांच्या निवडीबाबत प्रशासनाधिकारी शाहू सतपाल यांनी आणि मुख्याध्यापक शंकर खजुर्गीकर तसेच संघटनेचे अध्यक्ष महेश हंचाटे, उपाध्यक्ष रहीम शेख सरचिटणीस सिध्दाराम पुजारी, कोषाध्यक्ष मोहोळकर, कार्याध्यक्ष लिंबीतोटे, केंद्रिय मुख्याध्यापक अन्सारी महिला शिक्षकसंघटक लता तडकलकर, शिवशरण, संगीता बावलत्ती, सुनिता कुलकर्णी, भालेकर, केंद्रसमन्वयक ई.न.जमादार गौरीशंकर, कोळी, ज्येष्ठ शिक्षक अयुब कलबुर्गी, मुख्याध्यापक हरवाळकर, उर्दू मुख्याध्यापिका बदरेजहाँ आणि सर्व पदाधिकारी, तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका न.प.शिक्षक संघ, अक्कलकोट यांच्याकडून कौतुक करण्यात येत आहे.



