अक्कलकोट ते सिन्नूर सिमेंट काँक्रिट रस्ता निकृष्ठ व अर्धवट स्थितीत

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट ते मैंदर्गी मार्गे सिन्नूर बॉन्ड्रीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता अर्धवट झाले असून, सदरील रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचे केलेले आहे. या संदर्भात कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग सोलापूर यांच्याकडे तक्रारी अर्ज करून 10 महिना उलटून गेले तरी संबंधित अधिकारी याकडे मुद्दाम कानाडोळा करीत असल्याने याबाबत राज्याचे लोकायुक्त यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे संगमेश्वर बमगोंडा यांनी सांगितले.
अक्कलकोट ते सिन्नूर बॉन्ड्रीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता अर्धवट झाले असून, राष्ट्रीय महामार्ग अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे ह्या रस्त्याचं काम निकृष्टपणे झाले आहेत. अक्कलकोट पासून एक कि.मीटर रस्ता सूध्दा व्यवस्थित झालेला नाही.
सदरील रस्तामध्ये चीर पडलेले असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठेकेदारांच्या मनमानीमुळे काम निकृष्ठ झाल्याने पावसाने रस्ता उखडलेले आहेत. नागरिकांतून राष्ट्रीय महामार्ग अधिकार्यांच्या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अक्कलकोट ते सिन्नूर बॉन्ड्रीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता अर्धवट झाले असून राष्ट्रीय महामार्ग अधिकार्यांनी त्या रस्त्याकडे लक्ष न दिल्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करून ठेकेदारांनी प्रशासनला कोट्यावधी रुपये लुटले आहे.
तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. राज्यातील दूरवरुन येणार्या दत्त भक्तांना नाहक त्रास होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सदर रस्त्याचे काम मंजूरीप्रमाणे होत नसून अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. म्हणून या रस्त्याची संबंधित क्वालिटी कंट्रोलच्या अधिकार्याकडून पाहणी व चौकशी करावेत, अशी मागणी तक्रारदार यांनी केले आहे.
अक्कलकोट ते मैंदर्गी मार्ग सिन्नूर बॉन्ड्रीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता ठेकेदारांनी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केलेले आहेत. कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग सोलापूर यांच्याकडे दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी तक्रारी अर्ज केले होते. परंतु 10 महिना उलटून गेले तरी संबंधित अधिकार्यांनी याकडे मुद्दाम अर्थपूर्ण कानाडोळा करीत आहे. म्हणून लवकरच लवकर लोकायुक्तकडे तक्रार करणार.
संगमेश्वर बमगोंडा, तक्रारदार, अक्कलकोट