अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासाला प्राधान्य देऊ मुख्याधिकारी गणेश शिंदे

। अक्कलकोट : प्रतिनिधी
राज्यातील टॉप फाईव्हमध्ये श्रीक्षेत्र अक्कलकोट असल्याने सर्वांगीण विकास हेच माझे ध्ये आहे; त्यामुळे तीर्थक्षेत्र विकासाला प्राधान्य असेल असे प्रतिपादन अक्कलकोट नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले. ते शहरवासियांच्या वतीने आयोजित सत्कारप्रसंगी गणेश शिंदे हे बोलत होते.
यावेळी शाल, श्रीफळ व हार देऊन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थि विकास महामंडळाचे संचालक प्रशांत भगरे, प्रविण देशमुख, अरविंद पाटील, सत्तार शेख, प्रविण घाटगे, मनोज गंगणे, शरद पवार, शुभम चव्हाण, शुभम सावंत, शिवा याळवार, प्रमोद जाधव, दिनेश बंडगर, सावळाराम यादव, विजय माने, गोविंद शिंदे आदीजण उपस्थित होते.
मुख्याधिकारी गणेश शिंदे पुढे बोलताना म्हणाले, अक्कलकोट नगरपरिषदेचा पदभार घेतल्यानंतर शहरातील विविध समस्यांसह भागांची माहिती घेतलेली आहे. राज्यातच पाणी टंचाईच्या बाबत अक्कलकोट नगरपरिषद प्रसिध्द आहे. आम्ही राज्यातल्या अन्य नगरपरिषदेत त्याकाळात कार्यरत होता. मात्र टंचाईबाबत अक्कलकोटची चर्चा व्हायची. मात्र आता प्रत्यक्षात काम करण्याची संधी मिळालेली आहे.
तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या विकासासाठी विविध योजनाच्या माध्यमांतून सर्वांगीण विकासाकरिता कटिबध्द असून पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबर अतिक्रमणे, तीर्थक्षेत्र विकास, उद्याने, नागरिकांच्या मुलभूत गरजा सोडविण्याकामी कटीबध्द असल्याचे गणेश शिंदे म्हणाले.
नागरिकांनी अडचणी असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.