अक्कलकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी रविकांत धनशेट्टी

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष शिवलाल राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अक्कलकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी रविकांत धनशेट्टी यांची दुसर्यांदा बिनविरोध निवड झाली. तर सचिव सुभाष बिराजदार यांची निवड करण्यात आली. या बैठकीत उपाध्यक्षपदी विजय विजापूरे, कार्याध्यक्षपदी रियाज सैय्यद, खजिनदारपदी सिध्दाराम कोळी, संघटकपदी विश्वनाथ राठोड, प्रसिद्धी प्रमुख शंभुलिंग अकतनाळ, सल्लागारपदी शिवलाल राठोड, शंकर व्हनमाने, गंगाधर नागशेट्टी, यशवंत पाटील, सुरेश माने, राजशेखर विजापूरे, अनिल इंगळे सदस्यपदी प्रशांत जाधव, माणिकचंद धनशेट्टी, उषा हंचाटे आदींच्या प्रमुख उपस्थितीत नुतन कार्यकारिणी निवड करण्यात आली.प्रास्ताविक शंकर व्हनमाने यांनी केले. सूत्रसंचालन गंगाधर नागशेट्टी तर आभार संस्थापक अध्यक्ष शिवलाल राठोड यांनी मानले.