अक्कलकोटचे उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे यांची कार्य तत्परता

Samarth nagar

। अक्कलकोट : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यापासून मविश्व नगर म समर्थ नगर येथे मोठया प्रमाणात पाण्याच्या व्हॉल्व मधून पाण्याची गळती होत होती.विश्व नगर विकास समितीचे अध्यक्ष शिवाजी नाईक सरांच्या नेतृत्वाखाली आमचं एक शिष्टमंडळ उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे यांना भेटून समस्या सांगितली. त्वरित याची त्यांनी दखल घेवून पाणी पुरवठा विभागाचे खरात यांना कळविले. खरात यांनी सुद्धा याची त्वरीत दखल घेत त्यांनी आपल्या टीम सह रोहित खरात, वैभव कटके यांना घेवून व्हॉल्वचे काम पूर्णत्वास नेले. यातून उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे यांच्या कामाची चुणूक दिसून आली. यशवंत धोंगडे व खरात यांचे वैभव कटके यांचा आम्ही विश्वनगर विकास समिती कडून कौतुक होत आहे. या कामी समितीचे प्रा.जिड्डीमनी, अशोक हत्ते, अरूण पाटील व सदस्यांनी परिश्रम घेतले.

About Author