हाथरस येथील हत्याकांडातील आरोपीस फाशी द्या

रिपब्लिकन पक्ष्याच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
। अक्कलकोट : प्रतिनिधी
उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील मनीषा वाल्मिकी या दलित समाजाच्या मुलीवर बलात्कार करुन निर्घुण हत्या करण्याचा प्रयत्न करणारे आरोपींना तात्काळ अटक करुन फाशी द्या असे निवेदन अक्कलकोट रिपाइं (अ) च्यावतीने तहसिलदार यांना देण्यात आले.
सदरील निवेदनात असे नमूद केले आहे की, उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील मनीषा वाल्मिकी या दलित समाजाच्या मुलीवर बलात्कार करुन निर्घुण हत्या करण्याचा प्रयत्न करणारे आरोपींना तात्काळ अटक करुन जलदगती न्यायालयमध्ये निकाल लाऊन तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी. या प्रकरणातील दोषी असलेल्या जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी व इतर प्रशासकीय कर्मचार्यांना तात्काळ कामावरून कायमस्वरूपी कमी करून त्यांच्यावर कठोर शासन करण्यात यावे. पिढीतांच्या कुटुंबाना तात्काळ पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. कुटुंबियांना वाय+ संरक्षण देण्यात यावे. पीडित कुटुंबांना न्याय न मिळाल्यास रिपाइंच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन नायब तहसीलदार संजय राऊत यांना तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
या याप्रसंगी रिपाई नेते राहुल रूही, अप्पा भालेराव, अंबादास शिंगे, रोमीत मडिखांबे, सुरेश गायकवाड, शुभम मडिखांबे, शहर अध्यक्ष प्रसाद माने, नागेश मडिखांबे, सतीश बनसोडे, रवी बनसोडे, अरब शेख, नागेश कांबळे, गणेश भालेराव यांच्यासह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.