हजरत टिपु सुलतान फौंडेशनने केले अनाथांना चादरींचे वाटप

। अक्कलकोट : प्रतिनिधी
येथील शहीद टिपू सुलतान फौंडेशन च्या वतीने सध्या पडत असलेली कडाक्याची थंडी लक्षात घेऊन रस्त्यावर राहणारे लोक तसेच वेडसर व भिकारी व्यक्ती यांना येथे पोलीस निरीक्षक के एस पुजारी यांच्या हस्ते व नगरसेवक सलीम चाचा येळसंगी यांच्या प्रमुख उपस्थितत चादरींचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम टिपू सुलतान फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख (सद्दाम) यांनी घेतले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष मशाक शेख, सचिव अकीब बागवान, सह सचिव सुभान नाईकवाडी,खजीणदार करीम शेख यांच्या सह शाहनूर शेख, योगेश पुसके, राजू बागवान, सैफन शेख, असिफ रेड्डी, सोहेल बागवान, अरबाज येलसंगी, असिफ पटेल, आदम शेख, तौफिक मुजावर,, राजू मुल्ला, सरफराज शिकलगार, सरफराज तांबोळी यांच्या सह अनेक कार्यकर्ते नागरिक उपस्थितहोते