स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी गांधींचे विचार समाजात पेरण्याचे काम केले

Shoksabha

। अक्कलकोट प्रतिनिधी
आयुष्यभर डोक्यावर गांधी टोपी घालून गांधीजीचे विचार अंगीकृत करून ते विचार समाजात पेरण्याचे काम स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी केले असुन अशा माणसांचे निधन गांधी जयंती दिवशी झाले ही भाग्याची गोष्ठ असुन त्यांच्या कार्याची पोच पावती आहे, अशी श्रध्दाजंली सर्जेराव जाधव सभागृह अक्कलकोट येथे आयोजित शोकसभेत मान्यवरांनी व्यक्त केली.
या शोकसभेत श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, फतेसिंह शिक्षण संस्था, अक्कलकोट तालुका पत्रकार संघ, धनगर समाज बांधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, सोलापुर जिल्हा विरशैव माळी समाज आदीसह विविध सामाजिक संस्था समाज, राष्ट्रीय पक्षाच्यावतीने श्रध्दाजंली वाहण्यात आली
याप्रसंगी नगराध्यक्षा शोभा खेडगी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, जिल्हा परिषद सदस्य मल्लीकार्जुन पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दिलीप सिद्धे, न.प.विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी, उद्योगपती काशीनाथ गोळ्ळे, सोलापुर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके, दक्षिण सोलापुर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे, बाबा निंबाळकर, अरुण जाधव, सुरेश सुर्यवंशी, भिमाशंकर कापसे, अ‍ॅड.विजय हर्डीकर, बसवराज माशाळे, शिवानंद कुंभार, ममता उद्योग समूहाचे राजशेखर हिप्परगी, अविनाश मंगरुळे, माजी नगरसेवक शबाब शेख, रामचंद्र समाणे, विश्वनाथ हडलगी, अभिजित लोके, परमेश्वर अरबळे पंचायत समिती सदस्य आनंदराव सोनकांबळे, उत्तम गायकवाड, गफुर शेरीकर, नगरसेवक सद्दाम शेरीकर, माजी सभापती महेश जानकर, पंचायत समिती सदस्य विलास गव्हाणे यांच्यास विविध मान्यवर उपस्थित होते.

About Author