सातनदुधनी येथे महर्षि वाल्मिकी जयंती साजरा

। सातनदुधनी : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील सातनदुधनी येथे विविध संस्थेच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमा पूजन सरपंच विठ्ठलराव खताळ यांच्या हस्ते तर पुष्पहार संगमेश्वर कोळी यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.
यावेळी कोळी महासंघ विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष तथा जयदुगा समाजसेवी संस्थाध्यक्ष देवेंद्र कोळी, दुधनी मार्केट कमिटी संचालक भिमराव अरबाळे. अशोक काळे. ग्रामपंचायत सदस्य काशीबाई करजगी. संस्थेचे सदस्य कविता कोळी. कमलाबाई सोलंकर. मलव्वा कोळी. मल्लिकार्जुन कोळी. श्रीशैल कोळी. अप्पाशा करजगी. राज कोळी आदी उपस्थित होते.
तसेच कै. रकमाबाई जिवबा काळे प्रशालेत धर्मराज अरबाळे यांनी प्रतिमा पुजन करुन पुष्पहार अर्पण केले. कोरोना संसर्गाच्या महामारीबाबत जनजागृती करुन माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेवविषयी माहिती देण्यात आले. यावेळी दत्ता पांढरे, शिवशरण पाटील आदी उपस्थिती होते.