समर्थनगरमध्ये तीव्र पाणीटंचाई

deshmukh

‘लालफितीत’ अडकलेेले सदरची योजना तात्काळ मंजूर करण्याबाबत शिवसेना प्रमुख संजय देशमुख यांच्यावतीने निवेदन

। अक्कलकोट : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र अक्कलकोटनजीक असलेल्या समर्थनगर ग्रामपंचायतीच्या उपनगरात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून ग्रामस्थं पाण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहे. सध्याच्या पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मंजूर पाणीपुरवठा योजना ही ‘लालफितीत’ अडकलेेले आहे. तरी सदरची योजना तात्काळ मंजूर करण्याची मागणी पाणीपुरवठा राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांच्याकडे तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख यांनी निवेदन देवून केले आहेत.

श्रीक्षेत्र अक्कलकोटलगत समर्थनगर ग्रामपंचायत हद्दीतील समता नगर, लक्ष्मी नगर, विश्वास नगर, श्री स्वामी समर्थनगर, गीता नगर, विकास नगर, उल्हास नगर, विश्वनगर, एकतानगर, प्रियदर्शिनी सोसायटी, गुरुमित्र सोसायटी, नगरपालिका सोसायटी, भगवान सोसायटी, रुकुमाई नगर, आदर्शनगर, श्रीरामनगर, शिवपुरी यज्ञनगर, आबावाडी, कोरबु प्लॉटिंग, नूरनगर, दिशा विहार, साळुंकेनगर आदीशक्ती मंदिर परिसर, बॅगेहळ्ळी रोड या भागातून मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून निर्मलग्राम, शंभर टक्के शौचालय असलेली ही ग्रामपंचायत तीव्र पाणीटंचाईने त्रस्त आहे. तीर्थक्षेत्र अक्कलकोटजवळ असल्याने समर्थनगर ग्रामपंचायतीला महत्त्व असून या नगरातील काही भाग पर्यटन देखील होवू शकतो. मात्र पाणीटंचाई अभावी विकासाच्या बाबतीत कोसोदूर राहत असल्याचे चित्र आहे. याबाबत शिवसेना तालुका व शहराच्यावतीने पुढाकार घेवून समर्थनगर पाणीपुरवठा योजना ‘लालफितीत’ अडकलेली ती त्वरीत कार्यान्वित होवून सुरु करणेकामी प्रयत्न करीत आहे. दरम्यान रु.7 कोटी योजनेला मंजूरी मिळालेली असून निविदा देखील निघाली, मात्र वर्कऑर्डर न मिळाल्याने तांत्रिक बाबीमुळे सदरची योजना कितपत पडलेली आहे. तरी याबाबत त्वरीत निर्णय होण्याकामी ना.बनसोडे यांना निवेदन देण्यात आले. या बरोबरच एकरुख जलसिंचन योजना व गळोरगी तलाव सुशोभिकरणा करिता देखील ना.बनसोडे यांनी लक्ष घालणेची मागणी शिवसेनेनी केलेली आहे.
शिवसेना ता.प्रमुख यांनी पिण्याच्या पाण्याबाबतीत निर्णय होणेकामी अशा गहनप्रश्नी गांभीर्य ओळखून ना.बनसोडे यांची भेट रेल्वे स्थानकावर घेवून सदर बाबतची कैफियत संजय देशमुख यांनी मांडली. याबाबत ना.बनसोडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सदरचा विषय निकाली काढण्याबाबत तातडीने अंमल बजावणी बाबतची ग्वाही यावेळी दिली.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार, तालुका उपप्रमुख प्रा.सुर्यकांत कडबगावकर, प्रविण घाटगे, इस्माईल जमादार, आनंद बुक्कानुरे, तालुका महिला आघाडी प्रमुख वर्षा चव्हाण, शहर प्रमुख वैशाली हावनूर, उपप्रमुख ताराबाई कुंभार, ग्राहक संरक्षण मंच ता.प्रमुख रजाक सय्यद, शहर प्रमुख सुरेश डिग्गे, प्रसिध्दी प्रमुख बसवराज बिराजदार, खंडू कलाल, राहुल चव्हाण, गणेश आळंगे, विनोद मदने, बासलेगावचे प्रगतशिल शेतकरी शिवपुत्र बिराजदार व सेनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

About Author