सततच्या पावसामुळे शेती बनले गवताचे कुरण

Donmbar Javalge

। डोंबरजवळगे : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतात वाढत्या तणामुळे शेती गवताचे कुरण बनत असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
दररोज पडत असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे पिकाचे अतोनात नुकसान होऊन शेतात अतिशय गवत लागला आहे शेती बनले गवताचे कुरण सततच्या पावसाने अनेक दिवस शेतात पाणी साचून राहिला आहे वापसा येण्यास पंधरा ते वीस दिवस लागणार असून शेतात भयानक असा गवत लागून गेला आहे ते गवत काढण्यासाठी शेतकर्‍यांनी ट्रॅक्टरच्या रोटावेटर चा मदत घ्यावी लागणार कारण सतत पडणार्‍या पावसामुळे शेत पूर्णपणे गवताचे कुरण बनले असून रब्बी पेरणीपूर्वी शेत तणमुक्त करण्यासाठी शेतकर्‍याने ट्रॅक्टरचा रोटावेटर चा वापर करून शेतातील तण कमी करताना दिसत असतात पण सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांना शेतातील गवत काढणे अवघड होऊन बसले आहे वापसा येताच शेतकर्‍यांनी ट्रॅक्टरचा रोटावेटर च्या मदतीने आपले शेत स्वच्छ करतात शेतकर्‍यांना ट्रॅक्टर चे भाडे परवडत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे रब्बी हंगामासाठी शेतीची मशागत करून शेतातील तण कमी करण्याच्या कामास वेग आला असून मजुरी देऊन माणसं लावून शेतीचे बांध बंधारे स्वच्छ करत आहेत प्रत्येक शेतकरी टॅक्टरच्या साह्याने रोटावेटर मारुन रब्बी पेरणी करताना दिसतात सतत व दररोज पडत असलेल्या पाऊस पडत असताना या पावसामुळे शेतातील गवताची वाढ मात्र झपाट्याने झाली आहे शेतातील गवत बैलजोडीने अथवा गडीमाणसं लावून काढणे हे परवडत नसल्याने शेतकरी ट्रॅक्टर चा रोटावेटर चा वापर जास्त करून करत आहेत व्यवस्था म्हणून पीक उत्पादनात नैसर्गिक घटकामुळे येणारी घट लक्षात घेता सर्वाधिक घट ही पिकाबरोबर वाढणार्‍या ताणामुळे होतो विविध पिकाच्या सुरवातीच्या वाढीचा कालावधी पीक-तण स्पर्धेचा दृष्टीने संवेदनक्षम असतो या कालावधीत तणनियंत्रण केल्यास उत्पादनात घट येतो कमी होत चाललेला मजूर बळ त्यांच्या मजुरीत झालेली वाढ अनियमित पाऊस यासह अनेक कारणामुळे वेळेवर नियंत्रण करणे शेतकर्‍यांना अशक्य होत आहे पेरले ते उगवले पण त्याचबरोबर काही नको असलेले तण हे उगवत असते पेरले ते उगवले पण त्याच बरोबर काही नको असलेली तण उगवत असते त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते त्यामुळे मुख्य पिकाच्या वाढीवर परिणाम होतो आणि उत्पादनात ही घट होत असते.

सुरुवातीला पडलेल्या दुष्काळामुळे शेतमजुरांना शेतात कामधंदा उपलब्ध नव्हता दुष्काळाने शेतकर्‍यांसह मजुरांना उपासमारीची वेळ आली होती सध्याच्या हंगामात शेती कामासाठी शेतकर्‍याला शेतमजूर मिळेनासे झाले आहे त्यामुळे मजुरांअभावी शेतीची कामे ठप्प झाली आहेत
सत्यवान उदगिरे शेतकरी डोंबरजवळगे

About Author