शिक्षक समितीच्यावतीने ज्योतिर्लिंग कारंडे यांचा सत्कार

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अर्थ विभाग,जिल्हा परिषद,सोलापूर येथे कार्यरत असणारे कर्तव्यनिष्ठ वरिष्ठ सहाय्यक ज्योतिर्लिंग कारंडे भाऊसाहेब यांचा वाढदिवसनिमित्ताने सोलापूर जिल्हा प्राथ.शिक्षक समितीच्या वतीने लेखाधिकारी कुंभार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. अर्थ विभागातील शेडे भाऊसाहेब, बिराजदार भाऊसाहेब व अन्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कन्नड विभाग जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव, शिक्षक नेते राजन ढवण, शिवानंद बिराजदार, संतोष दांगट, इंद्रसेन पवार, दयानंद चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.