शिक्षकांना कोव्हीड-19 कामातून मुक्त करण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश जारी

Anil Kade

सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे यश

सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या सेवा कोव्हीड-19 च्या कामकाजासाठी अधिग्रहित केलेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपल्या अधिनस्त तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना दिल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी दिली.महाराष्ट्र शासनाने राज्यात15 जून पासून ऑनलाईन शिक्षणाचा आरंभ केला आहे.कोव्हीड-19 कामातून मुक्तता केल्याने जिल्हातील शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणावर लक्षकेंद्रित करता येईल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिक जोमाने प्रयत्न करता येईल असा विश्वास सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी व्यक्त केले.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन परिपत्रक दि.24 जून 2020 आणि 17 ऑगस्ट 2020 अन्वये ज्या शिक्षकांची सेवा कोव्हीड-19 आजारासंबंधी कामकाजासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत त्यांना कार्यमुक्त करणेबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करावी.सरप्लस असलेल्या व कोणत्याही आस्थापनेवर समायोजित न झालेल्या शिक्षकांना ते राहत असलेल्या ठिकाणा जवळच्या शाळेत बोलवून ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत त्यांचा उपयोग करून घेणेबाबत मा.मुख्य सचिव,महाराष्ट्र शासन आणि मा.प्रधान सचिव(मदत व पुर्नवसन)महसूल व वनविभाग मंत्रालय,मुंबई यांच्या मान्यतेने आदेशित केलेले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या सेवा कोव्हीड-19 आजारासंबंधी कामासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करणेबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना आदेश होणेबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दि.16 जुलै 2020 रोजी पत्राद्वारे विनंती केली होती.
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेत कोव्हीड-19 कामकाजासाठी सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची कार्यवाही तातडीने करण्याची विनंती केली होती.त्यानुसार आज दि.07 ऑक्टोबर 2020 रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपल्या अधिनस्त तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत आदेशित केले आहे.यासाठी संघटनेच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र नवले,पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे,पुणे विभागीय उपाध्यक्ष दत्तात्रय पोतदार,जिल्हाध्यक्ष अनिल कादे,जिल्हासरचिटणीस अमोगसिद्ध कोळी,राज्य नेते सुरेश पवार,शिक्षक नेते राजन ढवण,उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने,कन्नड विभाग जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव,दयानंद चव्हाण आदींनी पाठपुरावा केला.

About Author