शहाजी प्रशालेतील कु.नंदिनी बाके व मेहक कोरबु यांची एनसीसी कॅडेटसाठी निवड

maratha mandir

। अक्कलकोट : प्रतिनिधी

आपल्या प्रशालेच्या परंपरेला साजेशे यश मिळवुन प्रशालेचे नांव उज्वल करा असे आवाहन मुख्याध्यापक आर.बी.भोसले यांनी केले. मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेतील दोन विद्यार्थिनीं एन.सी.सी. कॅडेट कु. नंदिनी चंद्रशेखर बाके (नववी ब) व मेहक अल्ताफ कोरबु (नववी ब) यांची निवड प्रजासत्ताक दिन संचलन पूर्व पुणे येथे 12 आक्टोबर ते 21 आँक्टोबर 2020 रोजी होणार्‍या शिबीरासाठी झाली आहे.

याबद्दल त्यांचे गुरूवारी प्रशालेच्या प्रागंणात प्रशालेतर्फे अभिनंदन करून पुढील शिबीरासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मराठा मंदिर विद्यावर्धिनीचे अध्यक्ष अँड. प्रदिप विचारे, उपकार्याध्यक्ष मनोहन बने, सचिव चंद्रकांत खोपडे व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी कँडेटचे निवडीबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच एनसीसी युनिटचे कमांडिग आँफीसर कर्नल प्रशांत नायर, प्रशासकीय अधिकारी कर्नल एस.के. चौहान यांनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्याध्यापक आर.बी.भोसले, पर्यवेक्षक एस.यु.जंगाले, जेष्ठ शिक्षक एम.बी.बोधले, एन.सी.सी चे थर्ड आँफीसर एस.एस.जवळकोटे, ए.बी.शिंदे, जे.एस.बगले, आर.ए.जाधव, वाय.पी.कबाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्याध्यापक व उमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

About Author