वागदरी जिल्हा परिषदमध्ये सर्वाधिक नुकसान : सरपंच प्रदीप जगताप

Pradeep Jagtap

। अक्कलकोट : प्रतिनिधी
परतीच्या पाऊसमुळे वागदरी जिल्हा परिषद मतदार संघात वागदरी,गोगाव खैराट, किरनळी, घोळसगाव, भुरीकवठे, शिरवळ ,वाडी, यासह अनेक भागात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. यात सोयाबीन, कांदा, ऊस, तूर, भाजीपाला आशा प्रकारचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावे यासाठी मा मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसील यांच्या कडे निवेदन देण्यात येणार असल्याचे माहिती सरपंच संघटना तालुकाध्यक्ष प्रदीप जगताप यांनी केले आहे.
चित्रा नक्षत्र पाऊसाने अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात आल्याने तालुक्यातील सर्वच शेतकर्‍यांचे मोठ्या नुकसानी झाले आहे अनेक शेतकर्‍यांचे शेतामध्ये उडीद , सोयाबीन, काढून टाकलेले आहेत ते संपूर्ण नुकसान झाले आहे शेतकर्‍यांना सध्या मोठया संकटांना तोंड द्यावे लागत आहे शेतकर्‍यांनी कर्ज काढून शेतात पेरणी केले होते.
त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक संकटालाही तोंड द्यावे लागणार आहे त्यासाठी शेतकर्‍यांसाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर करावे व प्रत्येक शेतकर्‍यांना एकरी 20 ते 25 हजार पीक नुकसान भरपाई देण्यात यावे असे ही मागणी प्रदीप जगताप यांनी केले आहे.

About Author