लोकमंगल पतसंस्था व मातंग एकता आंदोलनच्यावतीने पत्रकारांचा सत्कार

Lokmangal pat

। अक्कलकोट : प्रतिनिधी
लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा अक्कलकोटच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
6 जानेवारी हा दिवस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मदिन हेच पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधुन लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने विविध पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे स्थानिक सल्लागार तथा माजी नगरसेवक शिवशरण जोजन तर प्रमुख पाहुणे म्हणून पुंडलिक जोडमोटे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपादक प्रविण देशमुख, पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार जगदाळे, अरविंद पाटील, शिवानंद फुलारी, शिवा याळवार, सेवानिवृत्त एएसआय सत्तारभाई शेख, मारुती बावडे यांचा पुष्पगुच्छ व भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी पतसंस्थेचे शाखाधिकारी कु.सविता लोकापुरे, वागदरी शाखेचे शाखाधिकारी श्रीकांत तंगशेट्टी, उमेश बुधवंत, अजय नागेशी, सपना कदम, पुजा जोजन, शंकर पाटील, भिमाशंकर प्रचंडे, सुधीर पुजारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन मंगेश सुर्यंवशी यांनी केले.

मातंग एकता आंदोलन अक्कलकोटच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त विविध दैनिकात काम करणार्‍या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या मार्गदर्शनाने मातंग एकता आंदोलनचे जिल्हा कार्याध्यक्ष वसंत देडे यांच्याकडून विविध पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपुलकी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुन्ना राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर कलशेट्टी, बसवराज कोळी, वैजनाथ मुकडे, आनंद साळुंक यांच्या उपस्थित पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार जगदाळे, शिवा याळवार, विश्वनाथ चव्हाण, अल्ताफ पटेल, अभिजित पतकी, प्रा.प्रकाश सुरवसे, रमेश भंडारी, राजु जगताप, अब्दुल शेख, गणेश भालेराव, महेश गायकवाड यांचा पुष्पगुच्छ व भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन वसंत देडे यांनी केले तर पत्रकारांच्यावतीने प्रा.प्रकाश सुरवसे यांनी आभार मानले.

About Author