लिंबाच्या आंबटगोड लोणच्याची रेसिपी

Lemon

साहित्य : 6 आवश्यकतेनुसार चिरलेले लेमन, 1 कप शेंगदाणा तेल, 3 चमचे मोहरीच्या बिया, 2 चमचे मेथीचे दाणे, आवश्यकतेनुसार हिंग, 2/3 चमचे मिरची पावडर, आवश्यकतेनुसार मीठ
कृती : लिंबू तेलात फ्राय करा, एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि हिंग घालावी. यानंतर पॅनमध्ये कापलेले लिंबू मिक्स करून सर्व सामग्री फ्राय करून घ्या. दुसर्‍या पॅनमध्ये मोहरी आणि मेथी दाणे तीन ते चार मिनिटांसाठी भाजून घ्या. भाजलेले मोहरी आणि मेथीचे दाणे मिक्सरमध्ये वाटा. लिंबू मऊ झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार जाडे मीठ घाला आणि सर्व सामग्री पाच ते सहा मिनिटांसाठी शिजवून घ्या. यानंतर पॅनमध्ये लाल तिखट टाका आणि सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने मिक्स करा. या मिश्रणामध्ये चुकूनही पाण्याचा समावेश करू नका. यानंतर लिंबांमध्ये मेथी आणि मोहरीची पूड टाकावी. सर्व साहित्य दोन ते तीन मिनिटांसाठी शिजू द्यावे. यानंतर गॅस बंद आणि लिंबाचं लोणचे थंड होऊ द्या. लोणचे थंड झाल्यानंतर एका बरणीमध्ये भरून ठेवा. पोळी, दही भात किंवा अन्य कोणत्याही पदार्थांसोबत या लोणच्याचा आस्वाद घ्या.

About Author