रुद्देवाडी येथे श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या हस्ते जय भारत लिंगाची स्थापना

Ruddewadi1

। अक्कलकोट : प्रतिनिधी
बोलो भारत माता की जय,हर हर महादेव,हवा मल्लिनाथ महाराज की जय या जयघोषात रुद्धेवाडी येथे नवीन वर्षाच्या शुभ मुहर्तावर सदगुरु श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते जय भारत लिंगाची स्थापना मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
रुध्देवाडी तालुका अक्कलकोट येथील टी.एस. पाटील यांचे द्वितीय सूपुत्र अनिल पाटील या शेतकर्‍यांनी सदगुरु श्री हवा मल्लिनाथ महाराज यांना 15 एकर शेतजमीन मोफत दान दिल्याने येथे जय भारतलिंगाची स्थापना करण्यात आले. जय भारतमाता सेवा समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा सद्गुरू श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराजानी रुध्देवाडी येथील पंचक्रोशीत केवळ आठ दिवसात जय भारतलिंग देवस्थानची उभारणी करून ‘देशच माझे घर देशच माझे परिवार’ तसेच देश पहिला नंतर सर्व काही या प्रमुख उद्देशाने जय भारतलींग देवस्थानाची उभारणी केले आहेत.
याप्रमाणे रुध्देवाडी, आंदेवाडी,चिंचोली,दुधनी मुगळी या पंचक्रशीतील शिवाराला जोडणारा रस्त्यावरील अनिल पाटील यांच्या शेतात 31 डिसेंबर रात्री 12 वाजता सदगुरू श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या अमृत हस्ते हजारो शिवभक्तांच्या उपस्थित फटाक्यांचे आतषबाजी करीत जय भारत लिंगाची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आला. यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी राष्ट्रगीत आणि शिवभजन,देशभक्ती गीत सादर केले. कर्नाटकातील इंडी तालुक्यातील माशाळ मठाचे माठाधिश ष ब्र श्री केदार शिवाचार्य सोलापूरचे बसवराज शास्त्री बसवन संगोळगीचे सिध्दगोंड पाटील यांच्या प्रवचन कार्यक्रम झाले. याप्रसंगी सदगुरू हवा मल्लिनाथ महाराजाची दर्शन आणि महाप्रसादाची लाभ घेवून भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. याप्रसंगी रुध्देवाडी आश्रम शाळेचे चेअरमन अण्णाराव करवीर, अरविंद ममनाबद, इरण्णा करवीर, लक्षमिपुत्र पाटील, सुरेश बिराजदार, रमेश बिराजदार, केंचप्पा पुजारी, अंदेवाडीचे सरपंच मल्लप्पा बिराजदार, भीमाशंकर कलमनी, महादेव घोळसर, चिंचोळीचे अण्णप्पा पाटील, श्रीमंत बिराजदार, रमेश कलमनी, राजु लकाबशेट्टी आदी भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

About Author