रिपाइंच्यावतीने खा.रामदास व सिमताई आठवले यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी प्रार्थना

। अक्कलकोट : प्रतिनिधी
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले व त्यांच्या पत्नी सिमाताई आठवले यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी. त्यांच्या सोबत करोड़ो चाहत्यांचे शुभेच्छा कायम आहेत त्यामुळे कोरोनावर मात करून साहेब पुन्हा गोरगरिबांच्या बहुजनांच्या सेवेत हसतमुखाने हजर रहावेत म्हणून लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशाने साहेबांच्या उत्तम आरोग्यासाठी अश्विन पौर्णिमेला रिपााइं आठवले गट अक्कलकोट शहर व तालुका कार्यकरणीच्या वतीने ता.अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या उपस्थितीत पौर्णिमादिवशी अक्कलकोट बस स्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धम्म वंदना घेण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते राहुल रूही, रिपाइंचे युवक तालुका अध्यक्ष आप्पा भालेराव, तालुका उपाध्यक्ष अंबादास गायकवाड, तालुका सचिव राजू भगळे, रिपाइं शहर अध्यक्ष प्रसाद माने, शहर संघटक अंबादास शिंगे, कार्याध्यक्ष अप्पाशा लाच्यान, शहर उपाध्यक्ष सुरेश गायकवाड, शुभम मडिखांबे, नागेश कांबळे, महेश गायकवाड, भीमाशंकर गायकवाड, स्वामींनाथ पोतदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते