राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप

sanyasevak

। अक्कलकोट : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अक्कलकोट मुख्य महामार्ग मार्फत अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्त गावांना अन्नधान्य वाटप करण्यात वाटप करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा मुख्य महामार्गसह प्रमुख संदीप कटकधोंड, जिल्हा बौद्धिक प्रमुख संतोष वगाले, अक्कलकोट तालुका मुख्य महामार्ग तालुका प्रमुख संतोष बिराजदार, अक्कलकोट ते दुधनी महामार्गावरील रामपूर बोरीउमरगा, संगोगी (ब), सांगवी येथे मुख्य महामार्गावरील गावप्रमुख शिवनिंगया स्वामी, राहुल सुतार, आयप्पा होदे, जिल्हा आरोग्य समिती प्रमुख रमेश कापसे, तालुका कार्यवाह चंद्रकांत जकापुरे, गुंडू अण्णा येळमेली, चेतन जाधव, सुशील हिरस्कर, आदित्य जोशी, शिवशरण इचगे, बसवराज साखरे व पूरग्रस्त भागातील गावकरी उपस्थित होते.

About Author