यादवाड बंधूंच्यावतीने हिळ्ळी पूरग्रस्तांना धान्य व साहित्य वाटप

। अक्कलकोट : प्रतिनिधी
यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन अक्कलकोट तालुक्यातील हिंळी गावात आलेल्या महापुरात अनेकांची घरे पाण्याखाली जाऊन भयंकर नुकसान झाले अशा पूरग्रस्त गरीब कुटुंबांचा देवदूत बनून येशील राजशेखर गंगाधर यादवाड, संगमेश गंगाधर यादवाड, वीरभद्र गंगाधर यादवाड व परमेश्र्वर गंगाधर यादवाड या चारही बंधूनी त्यांच्या मातोश्री महादेवी यादवाड यांच्या शुभहस्ते साधारणपणे लाखाच्यावर किमतीचे धान्य व साहित्य वाटून मदतीचा हात दिला.
या अन्नधान्य वाटप प्रसंगी दक्षिण सोलापूर प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत हत्तूरे, पूणे येथील नाना मेमाणे, शरद दसवडकर, मुकेश पोरे, रोहित एडरम, गावचे तलाठी सचिन चव्हाण, काशिनाथ यादवाड, बंडू जमादार, संगण्णा यादवाड, सिद्धाप्पा सोलापूरे, शिवयोगी पुजारी, अशोक चप्पळगाव, नरसिंह कुलकर्णी, अक्कलकोट शिक्षक संघाचे सरचिटणीस अभिजीत सुर्डीकर, संजय देवकते, कांतू बाके, हणमंत शटगार, डॉ. आर. एस. ख्याता, म्हांतु बाके, भाऊ कुलकर्णी, बसवंत जमादार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी यादवाड बंधुमधील पुणे येथील व्यापारी व उद्योगपती संगमेश यादवाड यांच्या पुढाकारातून पुरामुळे नुकसान झालेल्या शंभर एक कुटुंबांना प्रत्येकी पाच किलो पीठ, दीड किलो साखर, एक किलो साबुदाणा, एक किलो तूरदाळ, अडीच किलो तांदूळ, एक किलो गूळ, एक किलो तेल, एक मिठ पुडा, हळद, तिखट, चहापत्ती, लाडू असे एकूण 15 किलो अन्नधान्य व खाद्यपदार्थ वाटले तसेच चहा गाळणी व एक- एक उबदार ब्लँकेट देऊन माया – मदतीचा ऊब दिला.
यापूर्वीही संगमेश यादवाड यांनी नुकतेच पुणे येथे कोरोना प्रादुर्भाव प्रसंगी पहिल्या लाकडांमध्ये शेकडो लोकांना अन्नधान्य वाटप करून मदतीचा हात दिला होता, संगमेश व परमेश्वर यादवाड हे हे गावात मागील दहा वर्षापासून एकाही रुपयांची देणगी न घेता दरवर्षी हनुमान यात्रा भरवतात व गरजूंना नेहमी मदत करतात. वीरभद्र यादवाड हे शिक्षकांच्या सांघिक क्षेत्रात काम करत असून शिक्षकांना नेहमीच मदत करीत असतात.
यावेळी परमेश्वर यादवाड यांनी अजून दानशुरांची मदत मिळवून देऊन संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले व व उपस्थितांचे आभार मानले.
या मदत कार्यात पुणे येथील रामकिशन सतपाल, संचेती ब्रदर्स, बालाजी राईस इंडिया, राहुल एंटरप्राइजेस, श्रेयश अँड कंपनी, मयूर ट्रेडिंग कंपनी व बंसीलाल एंटरप्राइजेस आदींची मदत मिळाल्याचे संगमेश यादव यांनी सांगितले. या वाटपाच्या कार्यक्रमाचे नियोजन सचिन यादवाड व नागेश यादवाड यांनी केले.