मुगाची सात्विक भाजी

साहित्य : भिजवून मोड आलेले मूग – 1 वाटी, ओले खोबरे – 2 ते 3 चमचे, जिरे – 1 चमा, हिंग, कडीपत्ता, साजूक तूप – 2 चमचे.
कृती : 1. भाजीच्या छोट्या कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप घाला. 2. तूप चांगले गरम झाले म्हणजे त्यात 1 चमचा जिरे टाका. जिरे चांगले परतून घ्या. त्याचा घमघमाट सुटला पाहिजे. 3. छोटा पाव चमचा हिंग आणि भरपूर कडीपत्ता घाला. चांगले परतून घ्या. 4. मोड आलेले मूग 3 वेळा फिल्टरचे पाण्याने धुवून घ्या. ते कुकर मध्ये घाला. ओले खोबरे, चवीनुसार मीठ घाला. चांगले मिक्स करा. 5. मूग बुडतील इतपत फिल्टरचे पाणी घाला. 6. कुकरचे झाकण लावून 3 शिट्या घ्या. 7. तयार झाली तुमची मुगाची सात्विक भाजी.