मुख्याधिकारी यांना ‘प्रहार’कडून समस्यांबाबत मोठ्या तक्त्याचे भेट

। अक्कलकोट : प्रतिनिधी
शहरातील अनेक समस्यांवर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने समस्यांचा भला मोठा तक्ता देण्यात आला.
अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पदाचा पदभार घेतलेले नुतन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांचा प्रहार संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रहारचे शहराध्यक्ष अमर शिरसाट यांनी मुख्याधिकारी यांच्यासोबत शहरातील अनेक समस्यांबाबत चर्चा केली. शहरातील काही समस्यांवर मुख्याधिकारी यांच लक्ष वेधण्यासाठी मुख्य समस्या असलेला मोठा तक्ता मुख्याधिकारी यांना देण्यात आला. सदरील तक्त्यामध्ये शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त व्हावा, शहरातील ए-वन चौक येथील हुतात्मा स्तंभाचे नूतनीकरण करावे, सर्वसामान्यांना परवडणारे असे नगरपरिषदेचे प्रियदर्शिनी मंगल कार्यालय त्वरीत सुरु करावे, शहरात महिलांसाठी स्वच्छता गृह बांधावेत, शेतकर्यांना आठवडी बाजारात बसण्याची व्यवस्था करावी, शहारातील तारामाता बाग व श्री स्वामी समर्थ उद्यानाची व्यवस्था व्हावी, गटारी-नाले नियमित साफ करुन आठवड्याला प्रत्येक वार्डात आरोग्यविषयक फवारणी करावी, रमाई घरकुल व पंतप्रधान योजनेचे काम जलदगतीने व्हावे, नगरपरिषदेचे राखीव पाच टक्के निधी दिव्यांग बांधवाना खर्च करावा असे या मोठ्या तक्त्यात नमूद करण्यात आले आहे. तरी लवकरात लवकर वरील समस्यांच निराकाण व्हावे अशी विनंती करण्यात आली.
यावेळी प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष अमर शिरसाट, जिल्हा युवक सचिव गोटु माने, निशांत निंबाळकर, राहुल वाले, अबु सुभेदार, राजु बनसोडे, बिरू सरवदे, स्वामीराव पाटोळे, आकाश जाधव आदींसह प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.