ममनाबाद येथील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

mamnabadddd

। ममनाबाद : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे बोरी व हरणा नदीत प्रचंड पाणी आल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील नदी काठच्या गावांना जोरदार फटका बसल्याने अनेक शेतकर्‍यांचे शेतातील पिकांसह जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ममनाबाद येथील शेतकरी शरणप्पा महादेव बिराजदार यांचे दोन एकर उस, चार एकर तूर पीक, 10 पोते ज्वारी, 8 पोते गहू, 2 पोते जोड, 2 पोते तूर, 2 पोते हरभरा, 20 पोते खत यासह शेतातील राहत्या घराची दूरावस्था झाल्याने सुमारे एक लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. ममनाबाद येथील पन्नासहूनअधिक शेतकर्‍यांचे पिकासह घराची पडझड, जनावरे दगावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तरी महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून बळीराजाला आर्थिक मदत करावी अशी मागणी ममनाबाद पंचक्रोशीतून होत आहे.

About Author