ममनाबाद पूरग्रस्तांना भरमशेट्टी परिवार व जयहिंद फूड बँकच्यावतीने जीवनावश्यक किटचे वाटप

। ममनाबाद : प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे ममनाबादयेथील पूरग्रस्तांना भरमशेट्टी परिवार व जयहिंद फूड बँकच्यावतीने जीवनावश्यक वस्तू व अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले.
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मौजे ममनाबाद परिसरातील बोरी नदीला पूर आला होता. नदीचे पाणी गावातीलवस्तीमध्ये घुसून अनेक घरांना याचा तडाखा बसला होता. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. यामुळे रहिवाशांचे संसारोपयोगी वस्तू सह जीवनावश्यक वस्तूंचेमोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
त्यामुळे तेथील नागरिकांना त्याचा सामना करावा लागला. त्या स्थितीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.
दरम्यान, या घरांमध्ये राहणार्या नागरिकांना व महिलांनाकिरण भरमशेट्टी व अंकुश चौगुलेयांच्या हस्ते गहू, तांदूळ, डाळ, चहा पावडर, दूध, साबण, साखर, निरमा आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी चे संचालकश्रीशैल भरमशेट्टी, ग्रामदैवतमल्लिकार्जुन देवस्थानचे कार्यकारी सदस्यलक्ष्मण समाने, सिद्धाराम दोड्याळे, जयहिंद फूड बँकचे कार्यकर्ते, भरमशेट्टी मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.