बिनविरोध ग्रामपंचायतींना 15 लाख रु.विकास निधी देणार : आ.सचिन कल्याणशेट्टी

Sachin dada New photo

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट मतदारसंघातील ज्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडेल, त्या गावांना रु.15 लाख रुपयांचा विकास निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्णय आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतले आहे.
आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे सर्व स्थरातून स्वागत होत असून आ.कल्याणशेट्टी हे आमदार होण्या अगोदर आता झाल्यानंतरही उल्लेखनीय कार्य करणार्‍यामध्ये जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातच 288 विधानसभा मतदार संघ क्षेत्रात करीत आहेत. याचाच एक भाग असून अक्कलकोट तालुक्यात 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याकामी आ.कल्याणशेट्टी यांनी उचललेले पाऊल हे उल्लेखनीय आहे.
गावाच्या एकोपासाठी गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणुका ह्या जाहीर झाल्या आहेत. अद्यापही कोरोनाच्या संकटातून बाहेर आलेले नाही. अशा परिस्थितीत निवडणुकांमुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये, कोरोना सोबत लढणार्‍या प्रशासनावर अतिरिक्त ताण देऊ नये आणि निवडणूक खर्चाची बचत व्हावी म्हणून आपल्याला या निवडणुका बिनविरोध पार पडतील यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे आ.सचिन कल्याणशेट्टी म्हणाले.
‘हात मिळवू या, एकोपा टिकवू या, ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडू या’ असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांंनी केले आहेत.

About Author