बबलाद गावात बोरी नदीच्या पाणी शिरल्याने सुमारे 300 हेक्टर जमीन पाण्याखाली

babalad

। अक्कलकोट : प्रतिनिधी
14 ऑक्टोबर रोजी पडलेल्या पडलेला मुसळधार पावसामुळे व कुरनूर धरणातून पाणी सोडल्यामुळे बबलाद गावात बोरी नदीच्या पाणी शिरल्यामुळे अतोनात नुकसान झाले असून नदीकाठी असलेल्या सुमारे 300 हेक्टर जमीन पाण्याखाली गेले आहे.
परतीच्या पाऊस मुसळधार बरसल्याने आणि कुरनुर धरणाच्या परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरती असलेल्या बबलाद गावात आणि नदीकाठच्या भागात पाणी शिरल्यामुळे 300 हेक्टर जमिनीवरील उभे पीक कांदा, ऊस,तूर,कापूस पाण्यात गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून संपूर्ण गावातील 90 ते 100 कुटुंब घरामध्ये पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तू बरोबर सर्व साहित्याची नासाडी झाली आहे.
सर्व कुटुंब रस्त्यावर आले असून त्यांना प्रशासनाने दखल घेतली आहे ना लोकप्रतिनिधींनी दखल घेतली आहे. तरी प्रशासन त्वरित लक्ष घालून सर्व कुटुंबाचे आणि शेतीचे माहिती संकलन करून योग्य ते पंचनामे करून नुकसान भरपाई देऊन न्याय द्यावा असे विनंती गावचे माजी सरपंच राजकुमार लकबशेट्टी यांनी विनंती केले आहे.
आपत्कालीन व्यवस्थेला माहिती देऊन सुद्धा दखल न घेतल्यामुळे गावातील भैया दादा कुलकर्णी यांच्या शेतातील 4 गाई 5 गाई 9 पशु , 50 ते 60 कोंबड्या 2 शेळ्या असे पशुधनाची जीवहानी झाली आहे. गावातील पाण्याखाली गेलेले प्रत्येक कुटुंबाचे आणि शेतीचे त्वरित पंचनामे होऊन मदत मिळण्यासाठी नागरिक आक्रमक झाले आहे.शंभर वर्षात पहिल्यांदाच एवढा पाणी गावात शिरल्यामुळे लोक अचंबित झाले असून प्रशासनाकडून योग्य माहिती न मिळाल्यामुळे बबलाद गावातील लोकांच्या नुकसान झाले आहे. बघता 90 ते 100 कुटुंब घर पाण्यात बुडाल्यामुळे लोक सैरावैरा पळत होते कन्नड शाळेतील सर्व वर्गखोल्या ऑफिस ई- लर्निंग डिजिटल वर्गखोली संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे शाळेचे सर्व दप्तर शैक्षणिक साहित्य, दप्तर, ई लर्निंग साहित्य, पाण्याखाली गेले आहेत. कित्येक कुटुंबातील जीवनावश्यक वस्तू ज्वारी, गहू, मके, डाळ, हरभरा, तांदूळ, पीठ,कपडे, शेतीचे,घराचे,बँकेचे कागदपत्रे रोख रक्कम पाण्यात वाहून गेले आहेत. सध्या या कुटुंबांना आधार देण्याची गरज आहे. याकडे प्रशासन लोकप्रतिनिधी लक्ष देऊन गावातील सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची गरज आहे.
यावेळी गावातील माजी सरपंच राजकुमार लकबशेट्टी यांनी पाण्याखाली गेलेले कुटुंबांना दोन किलोचे तांदूळ ,पीठ जीवनावश्यक वस्तू देऊन कुटुंबाना मदत केले आहे. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दुधनीचे शाखाधिकारी सोप्पीनमठ मठ आणि माजी जेई बोधले साहेब यांनीसुद्धा गावातील पूर परिस्थितीची माहिती घेऊन वैयक्तिकरीत्या मदत देण्याचे सांगितले आहेत.
गावचे माजी सरपंच राजकुमार लकाबशेट्टी यांनी गावातील 90 ते 100 घरात पाणी शिरल्यामुळे सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या नासाडी झाल्याने प्रत्येक कुटुंब प्रमुखांना दोन किलो तांदूळ, दोन किलो पीठ व जीवनावश्यक वस्तु देऊन संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचे हात दिले आहे. यावेळी बबलाद शेतकरी विकास सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत देगाव, शाळा समितीचे अध्यक्ष श्रीशैल रोडगे, उपाध्यक्ष विश्वनाथ फुलारी, अण्णप्पा खिरगोंड, चंद्रकांत उकली, शब्बीर करजगी , दौलप्पा अचगोंड,संजू चांबार,संतोष क्षेत्री,संजू कोथली,नरसाबली शेख ,मल्लू कलशेट्टी, पार्वती चांबार,उपस्थित होते.

About Author