बँक ऑफ इंडिया अक्कलकोट शाखेकडून रु.1 कोटी 20 लाखांची हॉर्वेस्टर मशिनचे वितरण

। अक्कलकोट : प्रतिनिधी
शेतकर्यांना नेहमीच मदतीचा हात असणार्या बँक ऑफ इंडिया शाखा-अक्कलकोटच्यावतीने तालुक्यातील बणजगोळ येथील शेतकर्यास ऊस तोडणी हार्वेस्टर रु.1 कोटी 20 लाखांच्या मशीनची चावीचे वितरण बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक शरणप्पा पुजारी यांच्या हस्ते देण्यात आले.
ऊस तोडणी हार्वेस्टर मशीन ही स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रकाश खांडेकर यांनी घेतलेली आहे. तालुक्यातील सदरची दुसरी मशीन असून या मशीनमुळे ऊस तोडणी सुलभ व सोप्या पध्दतीने होणार आहे. या बरोबरच वेळेची, पैशाची बचत होऊन शेतकर्यांचे ऊस साखर कारखान्याला वेळेवर पोहोचल्याने ऊसाला टनेज देखील मिळण्यास मदत होणार आहे.
सदरची मशीन प्रकाश खांडेकर यांनी घेणार असल्याचे पंचक्रोशीत कळताच विविध साखर कारखान्यांकडून शेतकर्यांची तोडणी करिता मागणी केली जात आहे. या अत्याधुनिक हार्वेस्टर मशिनमुळे शेतकर्यांचा फायदा होणार आहे. त्यांनी घेतलेल्या पतपरवठा निर्णयाबाबत कौतुक होत आहे.
यावेळी प्रगतशील शेतकरी सिद्रामप्पा दोड्याळे, बँक ऑफ इंडियाचे लोन अधिकारी श्रीकांत अभिवंत, शेती अधिकारी अविनाश रुपनवर, विनायक लकुरे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ वर्ग उपस्थित होते.
वेळेची बचत
सदरच्या मशीनमुळे शेतकर्यांच्या वेळेची बचत होणार आहे. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोड मजूर मिळणे अवघड असते तरी या हार्वेस्ट मशीनमुळे ऊस तोडणी सहज होऊन तो साखर कारखान्यापर्यंत पोहचेल. या मशीनमुळे वेळ, पैसा, मनुष्यबळ, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ऊस जाण्यास मदत होणार आहे.
शरणप्पा पुजारी, व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया
शाखा-अक्कलकोट
बँक ऑफ इंडिया शाखा-अक्कलकोटमुळे शक्य
शेतकरी कुटूंबात जन्माला आलेलो आम्ही. नेहमीच जीवनात निसर्गाच्या लहरीपणामुळे चढ-उतार सतत पहायला मिळत आले. अशा एक ना अनेक अडचणींचा सामना करीत असताना बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक शरणप्पा पुजारी यांनी ऊस तोडणी हार्वेस्टर मशीन दिले. त्यांनी या माध्यमांतून जीवन फुलवायची संधी दिली आहे. त्यांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून शेतकर्यांची सेवा करीत राहीन.
प्रकाश खांडेकर, माजी संचालक
स्वामी समर्थ सह.साखर कारखाना लि.दहिटणे