बँकांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करु नये : संचालक प्रशांत भगरे यांची मागणी

। अक्कलकोट : प्रतिनिधी
स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र या सोलापूर जिल्ह्यातील बँकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्ज देण्याकरिता टाळाटाळ करु नयेत अशी मागणी संचालक प्रशांत भगरे यांनी केलेली आहे.
प्रशांत भगरे यांनी केलेल्या मागणीत म्हटले आहे की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमांतून मराठा समाजातील युवकांना स्वत:च्या पायावर उभे राहून उद्योजक बनण्याकरिता महामंडळाची वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना या दोन योजनांतर्गत कर्ज देण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र ह्या बँकांकडून टाळाटाळ करीत आहेत.
जिल्ह्यातील लाभार्थ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या अनेक शाखा आहेत. या शाखांनी लाभार्थ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली व करीत आहेत. या बँकेच्या अनेक शाखांमध्ये परप्रांतीय अधिकारी-कर्मचारी कार्यरत असल्या कारणाने महामंडळाच्या या योजनांची माहिती त्यांना नसेल तर त्या ठिकाणी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयाकडून व महामंडळाच्या समन्वयकांच्या माध्यमांतून दिली जाईल असे प्रशांत भगरे यांनी सांगितले
या दोन्ही बँकेच्या विभागीय अधिकार्यांसह संबंधित शाखा अधिकारी यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मराठा समाजातील युवकांच्या प्रकरणांना प्राधान्य द्यावेत असे भगरे यांनी सांगितले.
प्राधान्य द्यावेत
लाभार्थी महामंडळाकडून पात्रता प्रमाणपत्रासह कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांचे रितसर शासनाच्या पत्रासह बँकांना फाईल कर्ज मंजूरीकरिता दिली जाते. तेंव्हा संबंधित बँकांनी प्राधान्य द्यावेत, टाळाटाळ करु नयेत.
प्रशांत लक्ष्मणराव भगरे,
संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक
मागास विकास महामंडळ मर्या; मुंबई
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा योजनांचा राज्य अहवाल :
वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना : पात्रता प्रमाणत्र संख्या – 65 हजार 6373, कर्ज अदा करण्यात आलेल्या लाभार्थी संख्या – 11 हजार 309, आजपर्यंत वितरित करण्यात आलेली रक्कम – 49 कोटी 45 लाख 99 हजार 648 रुपये.
गट कर्ज व्याज परतावा योजना : पात्रता प्रमाणत्र संख्या – 408, कर्ज अदा करण्यात आलेल्या लाभार्थी संख्या – 12, आजपर्यंत वितरित करण्यात आलेली रक्कम – 12 कोटी 39 लाख 513 रुपये.
गट कर्ज प्रकल्प कर्ज योजना योजना : पात्रता प्रमाणत्र संख्या – 341, कर्ज अदा करण्यात आलेल्या लाभार्थी संख्या – 19, आजपर्यंत वितरित करण्यात आलेली रक्कम – 1 कोटी 90 लाख रुपये.