पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे जवान दाखल

NDRF3

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार, अनेक गावच्या नदी-नाल्यांना महापूर आल्याने गावचा संपर्क तुटला. एनडीआरएफच्या मदतीने नदीपलीकडे अडकलेल्या शेकडो नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आले असले तरी हजारो हेक्टर शेतात पाणी शिरल्याने शेतकर्‍यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत.
तुळजापूर, उमरगा, अक्कलकोट तालुक्यात चित्रा नक्षत्राच्या पावसाने मंगळवार, 13 ऑक्टोंबर रात्रो 8.30 ते बुधवार 14 ऑक्टोंबर 2020 दरम्यान झालेल्या 14 तास मुसळधार पावसमुळे तालुक्यातील सर्व पाझर तलाव, साठवण तलाव, बंधारे, नदी, नाले, ओढे तुडूंब भरुन वाहिले तर काही ठिकाणी महापूर आल्याचे चित्र दिसत होते. शंभर वर्षातून पहिल्यांदाच बोरी व हरणा नदीत प्रचंड प्रमाणात पाणी आल्याने नदीकाठच्या गावांना महसूल प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा देण्यात आले होते. 13 व 14 ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या वादळी वार्‍यासह मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या शेतकर्‍यांचे सर्व उभ्या पिकांत पाणी जावून कोट्यावधी रुपये पिकांचे नुकसान झालेले आहे. अनेकांचे घरांची पडझड झालेे, शेतात बांधलेल्या जनावरे वेळीच सोडविता न आल्यामुळे बुडून मृत्यू झाले तर शेकडो शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हैशी, बैल या पाण्यात वाहून गेले. बबलाद येथील शेतकरी भैय्या कुलकर्णी यांचे 4 गायी, 2 म्हैशी, 2 वासरु असे 8 जनावरे मुसळधार पावसामुळे दगावली आहेत. यामुळे तालुक्यात बहुतांश ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले होते. नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, त्यांच्या नाष्ट्ा व जेवणाची सोय करणे, नदीपलीकडे अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफच्या दोन बोटीव्दारे दोन पथकाच्या माध्यमांतून गुरुवारी सुटका करण्यात आले. बोरी रामपूर येथे एका शेतकर्‍याने शेतात मुक्कामासाठी गेला होता. पण अचानक पाणी आल्याने बचावासाठी झाडावर चढून बसला होता. तो 36 तासानंतर एनडीआरएफच्या पथकाच्या माध्यमातून सुखरुप सुटका करण्यात आले. तर आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसिलदार अंजली मरोड यांच्यासह एनडीआरएफच्या पथकाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा सुचना देत अडकलेल्या नागरिकांचे सुटका करीत ग्रामस्थांना येत असलेल्या अडचणींचे विचारपूस करुन ते तात्काळ सोडवित आपत्ग्रस्तांना जेवण व नाष्ट्याची सोय करुन दिले.हन्नूर, पितापूर, नन्हेगाव, कुरनूर, मोट्याळ, सिंदखेड, शिरसी, सांगवी, ममदाबाद, रामपूर, बोरी उमरगे, मिरजगी, जकापूर, कंठेहळ्ळी, सातनदुधनी, आंदेवाडी, संगोगी (ब), रुद्देवाडी, बिंजगेर, तळेवाड आदी गावांना या महापूराचा मोठा तडका बसल्याने शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाला आहे. अनेक गावात लाईट खांब, रोहित्र पडल्याने अनेक गावात गेल्या तीन दिवसापासून विज खंडीत झाले आहे.
एनडीआरएफच्या माध्यमातून बिंजगेर नदीपलीकडे अडकलेल्या 80 महिला, नागरिक, अबालवृध्दांना सुखरुप बाहेर काढुन सुरक्षितस्थळी पोहोचवण्यात यश आले. तसेच अक्कलकोट येथील रॉबिनहूडआर्मीच्यावतीने सांगवी, रामपूर, शिरसी आदी गावातील पूरग्रस्तांना अन्नदान वाटप करण्यात आले. महापूर आल्यामुळे वागदरी व मैंदर्गी रोडवरील वाहतुक ठप्प झाले होते.

 

कालरात्रीचे पूर परिस्थिती पाहता मी जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात होतेा. महापूरात अडकलेल्या नागरिकांचे सुटका करण्यासाठी एनडीआरएफ टीमची मागणी केलेली होती. त्यानुसार दहा जणांचे एक टीमप्रमाणे दोन टीमची देण्यात आले होते. त्या माध्यमातून बोरी नदीकाठच्या रामपूर, बिंजगेर, तळेवाड, संगोगी (ब) आदी नदीकाठच्या गावातील महापूरात अडकलेल्या ग्रामस्थांची सुखरुप सुटका करण्यासाठी सकाळपासून कार्यरत होते. सायंकाळच्या दरम्यान दोन्ही बोटी नादुरुस्त झाल्याने काही अडकलेल्या नागरिकांना काढता आले नाही. उर्वरित बचावकार्य 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी करण्याचे ठरले आहे. तरी नदी परिसरातील नागरिकांनी सतर्कतेने रहावे, आपले व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी

About Author