पंचगव्य व आयुर्वेद उत्पादन प्रशिक्षणांची अक्कलकोट येथून सरुवात

Dr. Digge

। अक्कलकोट : प्रतिनिधी
समाजातील जनमाणसांचा आरोग्याचा स्तर उंचावयाचा असल्यास प्राचीन आयुर्वेद विज्ञान व भारतीय गोवंशाच्या गायीचे गोविज्ञान यांच्या शिवाय पर्याय नाही. प्राचीन आयुर्वेद व पंचगव्य यांचे विज्ञान घरोघरी पोहचवण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर पंचगव्य उत्पादने व सेंद्रिय शेती उत्पादने यांचे प्रशिक्षणाचे आयोजन करणार असल्याचे आयुर्वेद गोविज्ञान परिषदेने पत्रकार परिषदेत माहिती दिली.
दि. 27 व 28 ऑक्टोबर रोजी अक्कलकोट येथे आयुर्वेद गोविज्ञान परिषदेच्या माध्यमातून पंचगव्य प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचे आयोजन मल्लिकार्जुन मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात देशी गोमातेच्या पंचगव्यांतून विविध उत्पादनांची निर्मिती, गोशाळा व्यवस्थापन, सेंद्रिय शेती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अक्कलकोट येथील समाजसेविका श्रीमती शकुंतला तानवडे यांची यासाठी पुढाकार घेवून याचे आयोजन केले होते.
सदर कार्यक्रमास आयुर्वेद गोविज्ञान परिषदेचे अध्यक्ष विवेक भोसले, कार्यकारी संचालक स्वानंद पंडित, कोअर कमिटी सदस्य डॉ. तृप्ती डिग्गे, डॉ. प्रदिप शेळके, डॉ. संतोष वैद्य, डॉ. रविंद्र अडके आदी मार्गदर्शन करणार आहेत. पुढच्या पुढीला वीषमुक्त अन्न मिळाले पाहिजे. सर्व गोशाळेचे रजिस्टर करावे जेणेकरुन पंचगव्य बाबत वेगवेगळे संशोधन, वस्तु तयार केले जातात ही माहिती सर्व गोपालकांना होईल. या सर्वाना एका व्यासपीठावर आणुन आर्युवेद गोविज्ञान परिषद काम करणार आहे अशी माहिती डाँ.पृथ्वी डिग्गे यांनी दिली. दुध तुप आणि ताक व गोमुत्र व गोमय हे पंचगव्य. पंचगव्य वस्तूंची माहिती व विक्री उपलब्ध आहे. शिकविले जाणार व मार्केट उपलब्ध केले जाईल. गोपालक यांना एका गाईपासुन 4 ते 5 हजार पर्यंत उत्पन्न मिळु शकते. दोन तासाचे मोफत माहितीसत्र असेल.नंतर सभासदासांठी कार्यशाळा असेल. शेतात प्रात्याक्षित करून शिकविले जाईल. या वेळी विरक्त मठाचे मनिप बसवलिंग महास्वामी सुरेश डिग्गे, प्रेमराज डिग्गे, दत्तात्रय साखरे उपस्थित होते. गोपालक व शेतकरी यांनी अधिक माहिती साठी पृथ्वी डिग्गे यांना 9322152996 या क्रमांकावर संपर्क करावे.

About Author