नुकसानग्रस्त शेतकर्यांना सांत्वनाची नाही तर मदतीची गरज आहे. मुख्यमंत्री महोदय मदत जाहिर करणार का?
। वागदरी : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात चित्रा नक्षत्रच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जन जीवन विस्कळीत झाले, तर शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. बळीराजा हतबल झाला असुन डोळ्यातुन पाणी आले आहे.
अक्कलकोट तालुका अनियमित पावसाच्या प्रदेशात येत असल्यामुळे येथील नागरिकांना ओला किंवा सुका दुष्काळाला सामना करावा लागतो. सतत सुका दुष्काळच जास्त असतो. क्वचित वर्षी ओला दुष्काळ परिस्थिती असतो. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असतो. या वर्षी सुरूवातीपासुनच चांगला पावसाळा होता. रोहिणी नक्षत्रापासुनच सर्व नक्षत्रातील पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील उडिद, मुग, भूईमुग, बाजरी, सोयाबीन, तीळ, तुर आदी पिके शेतक-यांच्या हातुन पाणी लागुन गेले. त्यामुळे येथील बळीराजा धास्तावला आहे. आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील सर्व पिकांची काढणी, रास करून उरले सुरले धान्य माती मोल भावाने विक्री केले. रब्बीच्या तयारीला लागले असतानाच चित्रा नक्षत्रच पावसाने हाहाकार माजला सोलापूरसह मराठवाड्यात अतिवृष्टि झाल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील सर्वच नद्या, नाले, ओढ्याला पूर आला. या पुरात शेती बरोबरच सर्वसामान्य नागरिकांचे संसार उघड्यावर आले. पुराच्या पाण्यात संसार उपयोगी वस्तु, धान्य, बैलबारदाना वाहुन गेला. महापूराचा तडाक्यातुन शेतकरी सावरणे मुश्किल बनला आहे.
नदी काटच्या नागरिक हतबल झाले. रातोरात सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. जीवित हानी झाले नाही. मात्र ऊस, फळबाग, भाजीपाले, द्राक्ष, सोयाबीन, फुलबाग यांचे अतोनात हानी झाली. वर्षभराचा मेहनत नका पावसाने वाया गेला त्यामुळे शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. संपूर्ण उभे पिक पाण्यात आहे, अडवे पडले आहे, सोयाबीन चा रास चालु होता पावसाच्या पाण्यात डोळ्या देखत वाहुन गेला. अनेक घरांची पडझड झाली, पंचनामा सुरू झाला. आता लाल दिव्याची गाडी सात्वन करण्यासाठी, पहाणी करण्यासाठी खेड्याकडे निघाली, मंत्री, अधिकारी, गल्ली बोळातील पढा-यांची धावपळ सुरू झाली. सांत्वना शिवाय शेतक-यांच्या पदरात काहीच पडले नाही. दि. 19 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अक्कलकोट तालुक्याचा दौ-यांवर येणार आहेत. नुकसानग्रस्त भागाची पहाणी करणार आहेत. पंचनामा करून अहवाल पाठवा असे आदेश देतील, निघुन जातील मात्र मदतीचा काय हा प्रश्न निरत्तरच रहाणार आहे.
सध्य परिस्थितीत शेतकरी, शेतमजुर, सर्वसामान्य जनता कंगाल झाले आहे. त्यांना सांत्वनाची नाही तर मदतीची गरज आहे. मुख्यमंत्री आज काय मदत करतील, काय घोषणा करतील या कडे तालुक्याचे लक्ष लागुन आहे.



