दुधनी विविध समिती सभापतीच्या निवडी बिनविरोध

। दुधनी : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील नगरपरिषदेच्या विविध समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत.
स्थायी समितीच्या सभापतिपदी नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, स्वच्छता व आरोग्य सभापतिपदी उपनगराध्यक्ष विजयकुमार मानकर, पाणीपुरवठा सभापतिपदी शिवानंद माड्याळ, महिला व बालकल्याण सभापतिपदी सुनंदा चिंचोळी, मागासवर्ग व कल्याण समितीच्या सभापतिपदी श्रीदेवी बसवनकेरी यांची निवड झाली. दुधनी नगरपरिषदेत काँग्रेसचे बहुमत आहे. त्यामुळे निवडी बिनविरोध झाल्या.
स्थायीच्या सदस्यपदी विजयकुमार मानकर, सुनंदा चिंचोळी, श्रीदेवी बसवनकेरी, स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सदस्यपदी सोमण्णा ठक्का, शबाना मोमीन, उदयकुमार म्हेत्रे, महेश पाटील, पाणीपुरवठा नियोजन विकास व बांधकाम समितीच्या सदस्यपदी अन्नपूर्णा पाटील, गुरुशांतप्पा परमशेट्टी, चांदसाब अ.रहेमान हिप्परगी, अतुल मेळकुंदे, महिला व बालकल्याण स्वास्थ्य समितीच्या सदस्यपदी सुषमा धल्लू, संगीता पाटील, सुवर्णा पाटील, अतुल मेळकुंदे, मागासवर्ग कल्याण समितीच्या सदस्यपदी ललिता गद्दी, सुशीला गोटे, उदयकुमार म्हेत्रे, महेश पाटील यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार जयंत पाटील यांनी काम पाहिले.