तोळणूरचे सुपूत्र लक्ष्मीपुत्र उप्पीन कार्यरत असलेल्या शाळेची जागतिक परिषदेसाठी निवड

uppin

। अक्कलकोट : प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील काल्लेखेतपाडा या दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने गेल्या काही वर्षात राबवलेल्या अभ्यास कोपरा, अभ्यास गट, बाल संसद, अभ्यास कुटी, पालक संपर्क हे उपक्रम राबवले आहेत. त्याची जागृतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ज्ञानप्रकाश फाऊंडेशनने 8 ऑक्टोंबर रोजी आयोजिलेल्या जागतिक शिक्षक परिषदेसाठी या शाळेची निवड झाली आहे. या शाळेतील चार शिक्षकांत दोघे शिक्षक हे सालापूर जिल्ह्यातील आहेत.
या जागतिक परिषदेसाठी जगभरातून 100 शाळांची निवड झाली. यात भारतातील नऊ शाळा निवडल्यात आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून काल्लेखेतपाडा या एकमेव शाळेचा समावेश आहे. या ठिकाणी कार्यरत शिक्षकांत सोलापूर जिल्ह्यातील रुपेशकुमार नागलगावे (मूळ रा. सोलापूर) व लक्ष्मीपूत्र उप्पीन (मुळ रा. तोळणूर ता. अक्कलकोट) यांचा समावेश आहे. जागतिक स्तरावर सादरीकरणाची मिळालेेली ही संधी अभिमानास्पद असल्याचे सहशिक्षक उप्पीन यांनी सांगितले.
परिषदेतील शिक्षणातील लोकसहभाग, पालक संपर्क आणि समाजाशी शिक्षकांचा सुसंवाद या विषयावरील परिसंवादासाठी या शशळेची निवड झाली आहे. 8 ऑक्टोबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेसहा ते सात या वेळेत ही परिषद होणार आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी हे काल्लेखेतपाडा शाळेविषयी बोलणार आहेत. तर फाऊंडेशनच्या पल्लवी मुखेडकर नियंत्रक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेसाठी शिक्षक व शिक्षणप्रेमींना नोंदणी करणे अपेक्षित आहे. यासाठी फाऊंडेशनची ही हीींिीं://ुेीश्रवशर्वीुशशज्ञ.ेीस/ या लिंक आहे. तर परिषदेसाठी हीींिीं://ु र्र्ूेीीीं.लश/- र्ळीं1श्र2शटलेी ही युट्युब लिंक आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन नगलगावे, उप्पीन यांनी केले आहे.

About Author