तालुक्यातील 9 ग्रामपंचायती बिनविरोध; महत्वाच्या लढतीकडे लक्ष

। अक्कलकोट: प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात लागलेल्या 72 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका पैकी 9 ग्रामपंचायती हे व भारतीय जनता पार्टी, काँग्रेस व ज्या त्या गावच्या गटनेते यांच्या प्रयत्नातून बिनविरोध झालेले आहेत.
सदरील 72 ग्रामपंतायतीच्या 634 जागेसाठी 1825 जणांनी नामनिर्देशन अर्ज भरले होते. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 673 जणांनी आपले अर्ज माघार घेतल्याने 1152 जणं निवडणूक रिंगणात होते. परंतु त्यातील बहुतांश गावातील प्रभागातून 172 उमेदवार बिनविरोध झाल्याने 980 उमेदवार रिंगणात आहेत.
सोमवारी सकाळी अकरा पासूनच तहसील कार्यालयात पॅनेल मधून जादा भरलेले अथवा व्यक्तिगत भरलेले अर्ज मागे घेण्यासाठी त्यांच्या ज्या त्या गावच्या पॅनल प्रमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली होती. प्रत्येक पॅनेल प्रमुखांनी आपल्या उमेदवाराला निवडणूक बिनविरोध व्हावा व निवडणूक लढविण्यासाठी सोईस्कर व्हावा, अर्ज भरलेल्या अनेक उमेदवारांचे रुसवे, फुगवे काढण्यासाठी आर्थिक तडजोडीसह मागील वाद मिठविण्याच्या आश्वासनाने उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी नानाविद प्रयत्न करतान दिसत होते.
अक्कलकोट तालुक्यात होत असलेल्या 72 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 70553 पुरुष तर 63879 स्त्री असे एकूण 1 लाख 34 हजार 439 मतदारांनी आपल्या मतदारांचे हक्क बजावणार आहेत. पण आता बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत व इतर सदस्य यांची निवडणूक न होता आता उर्वरित 634 जागांसाठी निवडणुकीचा फड रंगणार आहे. वागदरी, नागणसुर, चपळगाव, जेऊर, हैद्रा, गौडगाव (बु), कुरनुर, आदी अनेक मोठ्या गावात पारंपरिक प्रतिस्पर्धी यात लढती रंगणार आहेत. 72 पैकी नऊ ग्रामपंचायती पुर्णपणे बिनविरोध झाले असून उर्वरित 20 ग्रामपंचायतीचे 44 सदस्य बिनविरोध निवडुन आले आहेत. तालुक्यातील आंदेवाडी बु, शिरसी, उडगी, मातनळ्ळी, नागनहळ्ळी, बणजगोळ, कुमठे, हंद्राळ, तोळणुर या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर गुड्डेवाडी सहा, देविकवठे दोन, शेगांव आठ, आंदेवाडी खु पाच, बबलाद दोन, संगोगी अ एक, तोरणी चार, डोंबरजवळगे तीन, हालअळ्ळी अ एक, भुरीकवठे दोन, खैराट एक, गोगांव एक, बोरगाव.खुर्द चार, बागेहळ्ळी एक, कर्जाळ दोन, चप्पळगांव तीन, मोट्याळ एक, बासलेगांव एक, गळोरगी एक, गौडगांव खु पाच, मिरजगी एक, दोड्याळ सात, कलहिप्परगे एक, तडवळ एक, मुंढेवाडी दोन, मराठवाडी तीन, किणीवाडी एक, मुगळी एक, सिन्नुर सात, चिंचोळी मैं. दोन, सांगवी बु एक, सांगवी खुर्द सहा, चिक्केहळ्ळी दोन, पितापुर सहा, हन्नुर चार, वागदरी एक असे एकूण 172 सदस्य बिनविरोध निवडुन आले आहे. तर आळगे, चिंचोळी न, हिळ्ळी, इब्राहिमपूर, नागोरे, बादोले बु,साफळे, भोसगे, बर्हाणपूर, सिंदखेड, बोरोटी बु ,चप्पळगांववाडी,निमगांव, उमरगे, चुंगी, काझीकणबस, गौडगांव बु, हैद्रा , गुरववाडी, जेऊर, नागणसुर, किणी, कुरनुर, सुलेरजवळगे, कोर्सेगांव या गावात निवडणुका लागल्या आहेत.
तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायती आणि उमेदवारांची नावे
1)उडगी (गाव बिनविरोध) गिरीजा कलप्पा यळमेली, मल्लम्मा सायबण्णा पाटोळे, इरण्णा निळकंठ गायकवाड, निंगम्मा बसवराज कोळी, जगदेवी शटेप्पा धानशेट्टी, वालुबाई रमेश जाधव, सुनील खांडेराव मोरे, लक्ष्मीबाई नागण्णा म्हेत्रे.
2)आंदेवाडी (बु)(गाव बिनविरोध), सोमण्णा मल्लिकार्जुन कलशेट्टी, शिल्पा इरप्पा कुंभार, आरती प्रसन्ना कांबळे, श्रीमंत भरमण्णा यळमेली, सिद्धप्पा कलप्पा यळमेली, सविता मनोहर पुजारी, तेहशीन रमजान मणूरे,बसवराज श्रीशैल दुर्ग, कलप्पा इरण्णा पाटील,
3) कुमठे(गाव बिनविरोध)
चेतन शिवानंद पाटील, राजश्री अशोक हल्लोळी, खाजेबाई बडेशा नदाफ, शारदाबाई हणमंत कोटगी, रत्नव्वा शिवानंद पाटील, म्हाळपा तिपण्णा शिंदे, जयश्री कलप्पा मैंदर्गी
4)नागनहळ्ळी (गाव बिनविरोध)
कमलाबाई पापा राठोड, स्वप्नाली रुपसिंग राठोड, शशिकला काशिनाथ राठोड, आबिदाबी नज्जू सय्यद, रमेजा सैपन शेख, बाबू बंदू मुजावर, महानंदा जगन्नाथ टेंगळे, अहमदपाशा अब्दूलगफूर शेख.
5)तोळणूर (गाव बिनविरोध)
प्रीती वालीकर, विजयालक्ष्मी हुलमनी,संजीवकुमार व्हरकेरी, श्रीदेवी मनगुळी, प्रवीण रब्बा, सिद्रामप्पा पाटील, मल्लिनाथ म्हेत्रे, इंदुमती माळी, ज्योती फुलारी, शांता हुलमनी, विरभद्रप्पा उप्पीन.
6) मातनहळ्ळी(गाव बिनविरोध)
साहेबलाल महिबूब मुजावर,ज्योती श्रीरंग जाधव, चंद्रशा भोजप्पा बनसोडे, रेश्माबी रफिक जमादार, रकमाबाई सिद्राम बनसोडे, मंगल राहुल राठोड, सुनील वालचंद चव्हाण
7)हंद्राळ (गाव बिनविरोध)
मल्लिकार्जुन खंडप्पा काटगाव, सविता राजकुमार गायकवाड, गंगाबाई अंबण्णा तळवार, लक्ष्मीबाई गणपती हल्लोळी, रेवणसिद्ध शेटप्पा तडवळ, इरण्णा ईश्वरप्पा पुजारी, जयश्री गुरुपादप्पा तुप्पद.
8) बणजगोळ (गाव बिनविरोध)
सविता पाटील, महादेव बनसोडे, श्रीदेवी सनदी, नागाबाई व्हसुरे, रत्नमाला मुंळे, बसवंत मुंळे, राम मातोळे, स्वाती चव्हाण, जान्हवी कुंभार
9)शिरसी (गाव बिनविरोध) राजेश राठोड, मंगल पाटील, सोजर इंगळे, लक्ष्मी इंगळे, सुनंदा व्हनशेट्टी, राचय्या स्वामी बिनविरोध निवडुन आलेले सदस्य.
1) किणीवाडी सुरेखा खारूणे , 2 मिरजगी भिमण्णा पाटोळे, 3)मोट्याळ हलिमा फुलारी, 4)वागदरी महानंदा सावंत, 5)बबलाद अंबिका आजगोंडा, अनिता कलशेट्टी, 6)बोरोटी खुर्द उषाबाई नंदीवाले , लक्ष्मी चव्हाण, तुकाराम कोळी, 7)चप्पळगांव गौराबाई आचलेरे, धनश्री वाले, मल्लिनाथ सोनार, 8) चिकेहळ्ळी प्रिती दसाडे, यलप्पा झळके 9) गौडगांव खु महम्मदहुसेन शेरीकर, रहिमतबी वाडीकर, जिलेखाँ मुल्ला, दत्ता सोनकांबळे, रेश्मा सोनकांबळे 10) कलहिप्परगे प्रियांका कोळी, 11) हन्नुर मुक्ताबाई ढगे, सोनाली तळवार, शैलेंद्र पाटील, सागर कल्याणशेट्ट, 12) डोंबरजवळगे गौराबाई उद् गीरे , गितांजली नारायणकर, दिपाली गायकवाड, 13)कर्जाळ आशा इंगळे, रंजना इंगळे, 14) गोगांव महादेवी होळ्ळे, 15)भुरीकवठे मिलन बनसोडे, हणमंत पात्रे 16) खैराट सुनंदा मठपती, 17)तडवळ संतोष कुंभार 18)मुंढेवाडी सुरेश कोळी, जयश्री कोळी 19) पितापूर पुजाबाई व्हनमाने, कल्पना शिंगाडे सदाशिव पांढरे , पंडित देडे , मोहसीनी सगरी, शाईन सगरी 20)देवीकवठे मल्लेशी कोळी प्रियांका क्षेत्री आदीं बिनविरोध झाले.