तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी

। अक्कलकोट : प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने एकदिवसीय राज्यव्यापी आंदोलन नवीन तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका अध्यक्ष सुरेश गुत्तेदार व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्ता माडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
सदर धरणे आंदोलनास प्रांताधिकारी दिपक शिंदे व तहसीलदार अंजली मरोड यांनी आंदोलनस्थळी भेट दिली असता त्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष पिंटू गावडे, अक्कलकोट विधानसभा संपर्क प्रमुख शिवानंद गाडेकर, अक्कलकोट शहर अध्यक्ष स्वामीराव घोडके, अक्कलकोट महिला आघाडी तालुका अध्यक्षा अनिता घोडके, युवक तालुका उपाध्यक्ष विशाल निंबाळ, ज्येष्ठ नेते गुणवंत लवटे, भिमाशंकर बंदिछोडे, सिध्दाराम तोरणी, रेवणसिध्द शेरी, पवन शिरगण, महादेव सोनकवडे, तिपण्णा गावडे, रवी मंजुळकर, विजय गावडे, सिद्राम जाधव, बाळू पवार, देवेंद्र क्षीरसागर, अनिल उकली, स्वामीनाथ गुड्डे, चंद्रशेखर पाटील आदी उपस्थित होते.
तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की परतीच्या पावसाने सोलापूर जिल्हा व अक्कलकोट तालुक्यात मोठ़या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील उभे असलेले पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकर्यांच्या हातातोंडाला आलेले पिक वाया गेल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तरी शासनाने त्वरित कोणत्याही प्रकारची विलंब न करता तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच एकरी 50000 रु. अनुदान शेतकर्यांच्या खात्यात जमा करावे. आणि पुरामुळे अनेक घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड़यावर आली आहेत.
पशुधनांचे देखील जिवितहानी झाली आहे तरी या सर्वाना सरसकट पंचनामे न करता शासकीय मदत मिळवून द्यावी असे निवेदनात म्हटले आहे. सदर आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे व युवा नेते प्रा. राहुल रुही यांनी आंदोलनस्थळी येऊन जाहीर पाठिंबा दिला.