जनावरांना आजाररची लक्षणे आढळल्यास संपर्क साधा : डॉ.पोपळे

। अक्कलकोट : प्रतिनिधी
लंपी हा संसर्गजन्य रोग औषधोपचाराने कमी होणारी असून पशुपालक व मालकांनी घाबरण्याचे कारण नाही. जनावरांना धबडे उठणे, खाजवणे, चारा न खाणे असे लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशु संवर्धन लसीकरण पथकाचे प्रमुख डॉ.पोपळे यांनी केली आहे.
जनावरांना लंपी या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लसीकरण पथक पशुसंवर्धन विभाग सोलापूर यांच्यावतीने सदलापूर (ता.अक्कलकोट) येथे भव्य शिबीर घेण्यात आले.
पुढे बोलताना डॉ. पोपळे म्हणाले, गेल्या काही महिन्यापासून अक्कलकोट तालुक्यातील विविध भागातील बहूतांश गावात गाय, बैल, म्हैस, शेळ्या-मेंढ्या, कुत्रे यांना लंपी संसर्गजन्य रोगाचा झपाट्याने लागण होत असल्याचे जिल्हा परिषद पुश संवर्धन विभागाच्या निदर्शनास आल्याने तात्काळ लंपी आजाराचा लागण झालेल्या विविध गावात जनावरांचे शिबीर घेऊन लसीकरणाचे सत्र पंचायत समितीत पशु संवर्धन आरोग्य अधिकारी तोलाराम राठोड यांनी हाती घेवून जोमाने काम करीत असल्याने लंपी हे आजार आटोक्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी सदलापूरचे सरपंच सोमनाथ पाटील, डॉ.मणेरी, डॉ.पटेल, डॉ.काळे, डॉ.चब्बण, डॉ.माशाळ, डॉ.काळी, डॉ. शेख यांच्या उपस्थितीत सदरील शिबीर घेण्यात आला. शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न केले.