चुंगीच्या पूरग्रस्त समाजबांधवांना मी वडार महाराष्ट्राचा कडून आर्थिक मदत

। चुंगी : प्रतिनिधी
चुंगी (ता.अक्कलकोट) येथे मागील पंधरवाड्यात बोरी नदीला आलेल्या पुराने नदीकाठी असलेल्या नऊ वडार समाज बांधवांची घरे वाहून गेली होती. त्यासाठी सामाजिक जाण म्हणून अक्कलकोट तालुक्यातील मी वडार महाराष्ट्राचा कडून आर्थिक मदत देऊन त्यांना धीर देण्यात आला. अक्कलकोट तालुक्यात चुंगीला ता.14 रोजी मोठा पूर आला, त्यावेळी गावाजवळ असलेली नऊ वडार बांधवांची घरे पाण्यात वाहून गेल्याने बेघर झाली. त्यासाठी तालुका अध्यक्ष अंकुश चौगुले, सचिव विजय आळविकर यांनी पुढाकार घेत निधी जमविली आणि पहिल्या टप्यात त्यांना 35 हजार रुपयेचा रोख आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आला. आता यासाठी आणखी निधी गोळा करण्याचे सुरू असून येत्या काळात ती पुन्हा त्यांना देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
अत्यंत गरीब परिस्थितीत संसाराचा गाडा चालवीत असताना निसर्गाच्या प्रकोप झाला आणि असलेला निवारा सुद्धा वाहून गेला आहे. यासाठी वडार संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्रालयीन टीम,मयुर कुसाळकर, संतोष मोहिते, शंकर चौगुले आदींसह इतरांनी मदत देऊ केली आहे. सदर निधी विजय मंजुळे व इतर पूरग्रस्त यांच्याकडे देण्यात आली आहे.
सदर मदत निधी देण्याकामी अंकुश चौगुले, विजय आळविकर, तुकाराम धोत्रे, शिवानंद गुंजले, भारत भांडेकर, प्रशांत धोत्रे, बाबू मंजुळे, काशिनाथ मंजुळे, अंबण्णा पवार आदींसह वडार समाज बांधव यांनी पुढाकार घेतला आहे. चुंगी येथील या नागरिकांची घरे वाहून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यांना पुन्हा चांगला निवारा उपलब्ध करून देण्यासाठी आणखी मदतीची गरज आहे.समाजातील दानशूर व्यक्तींनी अडचणीत सापडलेल्या पुरग्रस्ताना सहकार्य करावेत असे आवाहन चौगुले यांनी केले आहे